शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पलावा सिटीत पहिल्यांदाच भरणार मिनी आॅलिम्पिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 19:22 IST

सुमारे २९ हजारपेक्षा अधिक नागरिकांसाठी गृहसंकुल तयार केलेल्या पलावा सिटीतील रहिवाशांसाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान अनेकविध क्रीडा स्पर्धा एकाच छताखाली आयोजिल्या आहेत.

ठाणे : सुमारे २९ हजारपेक्षा अधिक नागरिकांसाठी गृहसंकुल तयार केलेल्या पलावा सिटीतील रहिवाशांसाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान अनेकविध क्रीडा स्पर्धा एकाच छताखाली आयोजिल्या आहेत. लोकमत या स्पर्धांचे माध्यम प्रायोजक आहे. गेल्या पाच वर्षात पलावा सिटीत अनेक स्पर्धा झाल्या. मात्र, आपल्याच परिसरातील रहिवाशांसाठी अशाप्रकारची मिनी आॅलिम्पिक पहिल्यांदाच आयोजिली आहे.विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पलावा सिटीत पायाभूत सुविधांची सोय करण्यात आली आहे. फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस यासाठी स्टेडियम आहेत. माजी आंतरराष्टÑीय जलतरणपटू रूपाली रेपाळेप्रमाणे इतर अनेक आंतरराष्टÑीय, राष्टÑीय स्तरावरील खेळाडूंचे निवासस्थान पलावा सिटीत आहे. पलावा सिटी मॅनेजमेंट असोसिएशन आणि पलावा स्पोर्ट्स कौन्सिलच्यावतीने या स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. स्पर्धेचा उद्धाटन सोहळा २० जानेवारी रोजी तर समारोप २८ जानेवारी रोजी होणार आहे. पलावामध्ये १६ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा विविध वयोगटातील महिला आणि पुरूषांसाठी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक रहिवाशाला आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात सहभाग घेता येणार आहे. यात जलतरण, टेबल टेनिस, पूल, कॅरम, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, स्क्वॅश, रनिंग, सायकलिंग, लॉन टेनिस, बॅडमिंटन, कराटे आणि बुद्धिबळ या खेळांचा समावेश आहेत. याशिवाय २६ जानेवारी रोजी वॉकथॉन, कौटुंबिक रन, जिमिंग, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक खेळात पाच हजाराहून रहिवासी सहभागी होण्याची शक्यता असून वयोगटानुसार सर्वोत्तम कामगिरी करणाºया खेळाडूला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होणाºयांना सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला जाणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास रहिवासी उत्सुक असून शहरातील सर्व क्रीडापटूंना एकाच व्यासपीठावर आणून क्रीडा संस्कृती निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.