शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

डोंबिवलीत पहिल्यांदाच बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:33 IST

डोंबिवली आणि परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी खास बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यानी चवीनं खाणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीतला पहिला "बिर्याणी फेस्टिवल" शुक्रवार ते रविवार १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते १० या वेळेत स. व. जोशी विद्यालय पटांगण, छेडा रोड,सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व येथे आयोजित केला आहे.                                                                                                                                                                                               

ठळक मुद्दे"बिर्याणी फेस्टिवल" शुक्रवार ते रविवार १३,१४ आणि १५ एप्रिल  तीन दिवस असणारा हा फेस्टीवल सायंकाळी ५ ते रात्रो १० पर्यंत सुरू राहणार स. व. जोशी विद्यालय पटांगण, छेडा रोड,सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व येथे

 डोंबिवली- डोंबिवली आणि परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी खास बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यानी चवीनं खाणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीतला पहिला "बिर्याणी फेस्टिवल" शुक्रवार ते रविवार १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते १० या वेळेत स. व. जोशी विद्यालय पटांगण, छेडा रोड,सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व येथे आयोजित केला आहे.                                                                                                                                                                                               तीन दिवस असणारा हा फेस्टीवल सायंकाळी ५ ते रात्रो १० पर्यंत सुरू राहणार आहे. यात हैद्राबादी बिर्याणी, दम बिर्याणी, बांबू आणि मटका बिर्याणी,मलाई सिख बिर्याणी, इटालियन बिर्याणी, आगरी बिर्याणी, सुरमई बिर्याणी, अवधी बिर्याणी, मटण बिर्याणी, झमझम बिर्याणी, मेयोनीज बिर्याणी,शाही बिर्याणी आणि हो शाकाहारींसाठी काश्मिरी पुलाव, मोड आलेल्या धान्यांचा वापर करून केलेली पौष्टीक स्प्राऊट ( sprout)  बिर्याणी, पनीर लव्हरसाठी पनीर टिक्का बिर्याणी आणि अख्खा मसूर बिर्याणी, मश्ररूम बिर्याणी असे असंख्य बिर्याणीचे प्रकार या फेस्टीवलमध्ये उपलब्ध आहेत. बिर्याणी जागेवरच खाण्याची तसेच पार्सलची देखील सुविधा येथे असणार आहे. अशी माहिती आय़ोजक स्वराज्य इव्हेंट्सचे समर्थ व अविष्कार ग्रुपचे समीर चिटणीस यानी डोंबिवलीत पत्रकार परिषदेत दिली.                                                                                                         चटकदार बिर्याणी खाल्यावर कुछ मिठा हो जाए...म्हणून येथे शाही तुकडा, फिरनी, तुम्ही ऑर्डर दिल्य़ावर तुमच्या समोर बनवून दिले जाणारे आईसस्क्रिम आणि पान खायचे असेल फायर पानची देखील सोय आहे. फायर पान म्हणजे पान बनवून ते पेटवले जाते आणि तसेच पेटते पान तुम्ही तोंडात कोंबले जाते, तेव्हा त्याच्या वेगळ्या स्वादात तुम्ही हरवून जाता.                                                                                                                  ठाण्यात २३, २४ ते २५ फेब्रुवारी २०१८ मध्ये बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलला २० हजारहून अधिक बिर्याणी प्रेमींनी भेट दिली आणि सहपरिवार बिर्याणीचा यथेच्छ आस्वाद लुटला आणि इतकंच नाही तर दर्दी रसिकांनी या बिर्याणी फेस्टिवल मध्ये सादर होणाऱ्या गझल,शायरी, मुशायरे या कार्यक्रमांना सुद्धा पसंती दर्शवली होती. तीच रंगत आता डोंबिवली बिर्याणी फेस्टीवलमध्ये अनुभवता येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता बिर्याणी फेस्टीवलचे उदघाटन होईल. 

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणेkalyanकल्याण