शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आधी मीरा-भाईंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायीचा वाटा मागा, शिवसेनेचा भाजपला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 00:23 IST

स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे.

- अजित मांडके ठाणे : स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यानंतर स्थायी समिती किमान एक वर्षासाठी मिळेल, अशी आशा भाजपला होती. परंतु, आधी मीरा-भार्इंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायी समितीचा वाटा मागा, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिल्याची माहिती समोर आली आहे. मीरा-भार्इंदरमुळेच ठाण्यात शिवसेनेने भाजपची साथ न घेता त्यांना स्थायीपासून दूर ठेवल्याची धक्कादायक माहिती समोरआली आहे.स्थायी समिती सदस्यांची निवड काही दिवसांपापूर्वी करण्यात आली आहे. परंतु, या सदस्यनिवडीवरून राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. चुकीच्या पद्धतीने सदस्यांची निवड करून स्थायी समिती गठितच न करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करून स्थायी समितीत येणारे विषय थेट महासभेत नेऊन मंजुरीचा घाट घातला जात असल्याचेही राष्टÑवादीचे म्हणणे आहे.दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेने स्थायीपासून केवळ राष्टÑवादीलाच नाही, तर भाजपलासुद्धा दूर ठेवल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या वादावर दोन्ही पक्षांतील वरिष्ठांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पडदा पडला होता. परंतु, यावेळेस भाजपने स्थायी समितीत वाटा हवा असल्याचा हट्ट धरला आहे. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ आल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले होते.>भाजपला जर ठाण्यात स्थायी समितीमध्ये वाटा हवा असेल, तर आधी भाजपने मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे शिवसेनेला वाटा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ठाण्यात वाटा कसा मिळवायचा, असा पेच भाजपपुढे आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली, तरी स्थानिक पातळीवर युतीत तेढ असल्याचेच चित्र यानिमित्ताने दिसून येत आहे.