शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबुडव्यांना पहिला धक्का!, ‘सीकेपी’च्या खातेदारासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 06:30 IST

हेराफेरी करून सुमारे सात कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट घेऊन सीकेपी बँकेला लुबाडणाºया एका खातेदारासह बँकेच्या दोन शिपायांना आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली

ठाणे : हेराफेरी करून सुमारे सात कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट घेऊन सीकेपी बँकेला लुबाडणाºया एका खातेदारासह बँकेच्या दोन शिपायांना आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. खातेदारास कॅश क्रेडिट देण्याचे काम विकास कुबल आणि नरेंद्र जाधव या शिपायांनी केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.सीकेपी को-आॅपरेटिव्ह बँकेच्या लोकपुरम शाखेतील गैरव्यवहाराची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०१६ रोजी करण्यात आली होती. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला. बँकेतील गैरव्यवहाराविरोधात एकाकी लढा देणारे संचालक राजेंद्र फणसे यांनी ठेवीदारांच्या न्यायासाठी पाठपुरावा केला. रिझर्व्ह बँक आणि सीकेपीच्या अहवालानुसार २०११ ते १४ या कालावधीत बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले.बँकेचे खातेदार सत्येन सालवा यांना २ कोटी १५ लाख रुपयांचे कॅश क्रेडिट मंजूर करण्यात आले होते. सालवा यांना मुदतठेवीच्या ८५ टक्के या मर्यादेपेक्षा जास्त कॅश क्रेडिट देण्यात आले. आश्चर्य म्हणजे, बँकेच्या दोन शिपायांनी लिपिकांचे कोड वापरून त्यांच्या खात्यामध्ये वेळोवेळी मर्यादेपेक्षा जास्त कॅश क्रेडिटची उचल दिली.बँकेवर प्रशासक नेमल्यानंतर ३१ मे २०१२ रोजी ठेवीदारांनी ठेवी परत घेण्यासाठी बँकेत गर्दी केली होती. त्या वेळी बँक कर्मचाºयांनी काही ठेवीदारांच्या रकमा सालवा यांच्या कॅश के्रडिट खात्यात परस्पर वळत्या केल्या. सालवा यांनी ६ कोटी ९२ लाख १९ हजार ४७ रुपयांनी बँकेची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बँकेच्या अधिकाºयांनी शिपायांच्या हाती जाणीवपूर्वक यंत्रणा सोपवून गैरव्यवहार केल्याचा आरोपही तक्रारीमध्ये केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाअंती आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने जवळपास वर्षभरानंतर विकास आणि नरेंद्र या दोन्ही शिपायांसह खातेदार सत्येन सालवा यांनाही गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कर्ज वितरणात मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारामुळे नावलौकिक असलेल्या सीकेपी बँकेला उतरती कळा लागली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे कर्जबुडव्यांना पहिला धक्का लागला आहे.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा