शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पावसाचा पहिला बळी: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मुलीचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 19:13 IST

पहिल्या पावसाचा आनंद घेत दुचाकीवरुन मैत्रिणीसोबत जाणाऱ्या प्रियंका झेडे या मागे बसलेल्या २२ वर्षीय तरुणीचा टँकरच्या धडकेने मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पावसामुळे खड्डयाचा अंदाज न आल्याने तिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देघोडबंदर रोड नागला बंदर येथील घटनाअज्ञात टँकर पसारदुचाकीस्वार तरुणी जखमी

ठाणे : घोडबंदर रोडवरील नागलाबंदर भागात खड्डा चुकवितांना आपल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने प्रियंका झेंडे (२२, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या तरुणीचा मृत्यु झाला. तर तिची मैत्रिण तन्वी वसंत बोलाडे (२२, रा. यशोधननगर, ठाणे) ही जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.गायमुखमार्गे ठाण्याच्या दिशेने या दोघी पहिल्याच पावसाचा आनंद लुटत दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास येत होत्या. कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तन्वी दुचाकी चालवत होती. तर प्रियंका तिच्या मागे बसली होती. एक खड्डा चुकवितांना तन्वीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तशा या दोघी खाली कोसळल्या. त्याचवेळी मागून आलेल्या एका टँकरची प्रियंकाला धडक असली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रियंकाला टँकरची धडक बसली की खाली पडल्याने मार लागला याबाबत नेमकी माहिती नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अपघाती मृत्युची कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

‘‘ या अपघातात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे तन्वीचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात मागे बसलेली प्रियंकासह दोघीही खाली कोसळल्या. त्यावेळी एका टॅकरची प्रियंकाला धडक बसली. यात डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यु झाला.’’नासीर कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली पोलीस ठाणे. 

टॅग्स :thaneठाणेMumbai Rainमुंबईचा पाऊसAccidentअपघात