शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघाला प्रथम पारितोषिक; 150 हून अधिक पक्ष्यांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 14:48 IST

ठाणे रायगड जिल्हा पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघ या गटाने 154 पक्षी प्रजातीची नोंद करून प्रथम पारितोषिक पटकाविले आहे

डोंबिवली- ठाणे रायगड जिल्हा पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण स्पर्धेत शाहीन ससाणा संघ या गटाने 154 पक्षी प्रजातीची नोंद करून प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. पक्षी निरीक्षण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रोटरी क्लबच्या सभागृहात पार पडला. या स्पर्धेत 52 संघ (220 ) जणांनी सहभाग घेतला होता. दरवषीच्या तुलनेत यंदा या स्पर्धेला स्पर्धकांकडून जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांचा समावेश करून त्यांच्या मनात निसर्गा ची आवड निर्माण करणे, पक्षी संवर्धन आणि पक्षीनिरीक्षण याबद्दल आवड निर्माण करणो हा यामागे उद्देश होता. सातवी ते दहावीच्या 30 पेक्षा जास्त संघानी शालेय गटात नोंदणी केली होती. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांना ही स्पर्धेचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनी ही नजीकच्या पक्षी निरीक्षण स्थळाला भेटी दिल्या. 150 हून अधिक पक्ष्यांची नोंद या स्पर्धेत करण्यात आली. 

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कृष्ण गरूड व लघुकर्ण घुबड या दोन संघानी मिळविला. या दोन्ही संघानी 144 पक्षी प्रजातीची नोंदणी केली. सर्वाधिक पक्षी नोंदी महाविद्यालयीन गटातून पराग्रीन ससाणा यांनी केली. या संघात शादरुल साळवी, ऐश्वर्या आणि साकेत या विद्यार्थ्यांचा समावेश होता. शालेय गटातून सर्वाधिक पक्षी नोंदी कौकर या गटाने केली. या गटात मुकुल केंद्रे, अथर्व केरूर, आदित्य केरकर, उदय कवाडे, आदित्य चेक्काले यांचा समावेश होता. बर्ड ऑफ द डे म्हणजेच आजचा विशेष पक्षी यांचे पारितोषिक दोन संघाने देण्यात आले. काळा करकोचा हा विशेष पक्षी ठरला. गरूड संघ यामध्ये आर्या खातू, मैथिली, वैष्णवी, साक्षी, आदित्य यांनी पारितोषिक मिळविले. तर दुसरा चिमणी संघाने हे पारितोषिक पटकाविले. त्यामध्ये आचल भारद्वाज, निकिता, साक्षी, धैर्य हे होते. 

स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाला संघटनेचे प्रशांत पाटील , हिमांशू टेबेंकर, किरण कदम, स्वप्नील कुलकर्णी, प्रतिक प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षीतज्ञ संजय मोगा, सुधीर गायकवाड यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पारितोषिक प्रायोजित केली आहेत. वन्य या अॅपचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमांशू टेबेंकर यांनी केले. स्पर्धेचे  परिक्षण पक्षीतज्ञ अमेय केतकर, ऋतुजा फडके, बीएनएचएस संस्थेचे राजू कसंबे यांनी केले.