शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील कामाला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 02:01 IST

कल्याण-शीळ महामार्ग सहापदरीकरण : सात किमीसाठी ३० मे पर्यंत डेडलाइन

- अनिकेत घमंडी डोंबिवली : महाराष्टÑ राज्य रस्ते विकास प्राधिकरणातर्फे (एमएसआरडीसी) कल्याण-शीळ महामार्गाचे सहापदरीकरण सुरू आहे. २१ किलोमीटरच्या या रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात सात किलोमीटरचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा खोदकाम करण्यात आले आहे. महामार्गाला समांतर नव्या मार्गिका तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विविध तांत्रिक कामांमुळे मंदावलेले हे पहिल्या टप्प्यातील काम ३० मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा टप्पा पावसाळ्यापूर्वी वाहनचालकांना खुला केला जाणार आहे.पावसाळा तोंडावर आला आहे. सहापदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास वाहतुकीची समस्या गंभीर बनेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सात किमीचे काम १५ ते ३० मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोर्डे यांनी दिली. सात किलोमीटरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यांच्या दुतर्फा कडेला प्रत्येकी चार मीटर खोदकाम केले आहे. त्या ठिकाणी भरणी, सपाटीकरण सुरू आहे.या रस्त्यावर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता भविष्यात वाहतूककोंडीची समस्या उद्भवू शकते. त्यादृष्टीने कल्याण-शीळ या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. सध्या तेथे दुतर्फा दोन मार्गिका सुरू आहेत. त्यामध्ये आता दोन्ही दिशांना एका लेनची भर पडणार आहे. त्यामुळे छोटी वाहने दुचाकी, रिक्षा, टेम्पो आदी तिसऱ्या मार्गिकेमधून जातील. खोदकाम सहा महिन्यांपासून सुरू होते. जेसीबीद्वारे काम केले. दरम्यान, त्या कामामध्ये अडथळे येणारी अतिक्रमणे, महावितरणचे वाहिनी आदी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. काही दिवसांपासून खोदलेल्या ठिकाणी रोलर लावून जमिनीचे सपाटीकरण, पुन्हा खडीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होण्याचा विश्वास एमएसआरडीसी अधिकारी व्यक्त करत आहेत. पावसाळ्यानंतर उर्वरित १४ किमीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे बोर्डे यांनी सांगितले.विविध कामे होणारएकूण २१० कोटींचा निधी या रुंदीकरणाच्या कामासाठी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामध्ये आतापर्यंत अंदाजे ८ ते १० कोटींचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सुमारे ८० कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे. तीन रेल्वे ओव्हरब्रिज, उड्डाणपूल आणि रेलिंग, दुभाजक आदी अन्य तांत्रिक कामे उर्वरित निधीतून होणार असल्याचे बोर्डे म्हणाले. एका रेल्वे ओव्हरब्रिजचा खर्च सुमारे ३० कोटींचा असल्याचेही सांगण्यात आले.