शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लवकरच पहिले मराठी भाषा वृद्धी केंद्र : शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:13 IST

मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी ‘मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र’ सुरू करण्यात येईल. त्या केंद्राच्या माध्यमातून मराठी तरुणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, साहित्य संदर्भ, केंद्रीय उपक्रमांची माहिती दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. पहिले केंद्र ठाण्यात सुरू करण्यात येईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले. 

मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, मराठी भाषेचे बळ वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर आणि शालेय स्तरावर मराठी सक्तीची केली. मात्र, सक्तीने नव्हे तर भक्तीने मराठीचे बळ वाढवणे गरजेचे आहे. चित्रपट, ओटीटी वगैरेवरही मराठी भाषा वृद्धींगत होत आहे. 

चांगल्या गोष्टींची सुरुवातनगरविकास, उद्योग आणि मराठी भाषा विकास खाते यांनी एकत्रित येऊन मराठी सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्यातील सर्व शहरांत मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू केले जाणार आहे. त्याची सुरुवात ठाण्यातून होईल. सर्व चांगल्या गोष्टींची सुरुवात ठाण्यातून होते, असेही शिंदे म्हणाले. काही लोक मतांकरिता मराठीचा वापर करतात. काही लोकांना निवडणूक आल्यावर मराठी माणसांची मते आठवतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. 

घराबाहेर पडा, काम पाहा! शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अभिजात मराठी भाषेकरिता एक कोटी रुपयांचा निधी घोषित केला होता आणि त्याची पूर्तता आता लवकरच केली जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शासन जसे मराठी भाषेच्या हिताकरिता काम करते, तसेच प्रयत्न नागरिकांनीही करावेत, सरकारला विधायक सूचना कराव्या, असे सामंत म्हणाले. मराठी भाषा भवन कुठे आहे असे घरात बसून विचारणाऱ्यांनी घराबाहेर पडून त्याचे सुरू असलेले काम पाहावे, असा टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : First Marathi Language Enrichment Center Soon in Thane: Shinde

Web Summary : Eknath Shinde announced a Marathi language enrichment center in Thane, offering guidance for competitive exams and information on central initiatives. He emphasized promoting Marathi through passion, not compulsion, and criticized those using Marathi for political gain. Uday Samant highlighted government efforts and urged public participation.
टॅग्स :marathiमराठीEknath Shindeएकनाथ शिंदे