शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 18:15 IST

अभिमन्यू पुराणिक ठरला ग्रँडमास्टर

कल्याण: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं कल्याणमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेची शानदार सांगता रविवारी झाली. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अभिमन्यू पुराणिक ग्रँडमास्टर ठरला, तर मोहम्मद नुबेरशाह शेख, समीर काथमाले आणि अभिषेक केळकर इंटरनॅशनल मास्टर ठरले. फिडे मास्टरचा सन्मान श्रीनाथ राव एस.व्ही. याने पटकावला. शरथ नायर हा कल्याणमधील सर्वोत्कृष्ट मुलगा, तर पर्णवी राणे ही कल्याणमधील सर्वोत्कृष्ट मुलगी बुद्धिबळपटू ठरली. स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांच्या पुरस्कारांचं वाटप करण्यात आलं.भारतानं जगाला देणगी दिलेल्या आणि एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांनी वर्चस्व गाजवलेल्या बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून २१ आणि २२ एप्रिल रोजी जोशीज चेस अॅकॅडमी आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था यांच्या वतीनं पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याणमध्ये प्रथमच झालेल्या या स्पर्धेत ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कल्याणमधील युवा बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी पुरूष व महिला या श्रेणीत पहिल्या दोन क्रमांकाची विशेष पारितोषिके देण्यात आली. तसंच, ५५ वर्षांवरील ज्येष्ठ बुद्धिबळपटूंसाठी पहिल्या दोन क्रमांकाची पारितोषिके आणि दिव्यांग व अंध खेळाडूंसाठीही स्वतंत्र पुरस्कार देण्यात आले. ५५ वर्षांवरील बुद्धिबळपटूंच्या श्रेणीत बी. एस. नायक आणि सुरेंद्र सरदार यांना अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकाची पारितोषिके मिळाली. तर, अंध खेळाडूंच्या श्रेणीत आर्यन जोशी आणि रोशनी पात्रा यांनी पुरस्कारांवर नाव कोरले.ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटना, अखिल मराठी बुद्धिबळ संघटना आणि भारतीय बुद्धिबळ संघटना यांची मान्यता लाभलेल्या या स्पर्धेच्या अखेरीस अभिमन्यू पुराणिक, मोहम्मद नुबेरशाह शेख आणि अभिषेक केळकर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या बुद्धिबळपटूंशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या विजेत्यांना विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांना त्यांनी दिलेली उत्तरं यामुळे उदयोन्मुख बुद्धिबळपटू आणि त्यांच्या पालकांना बुद्धिबळ या खेळाचे विविध कंगोरे समजण्यास मदत झाली. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ