शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

मध्य रेल्वे शाळा कल्याण आंतरशालेय ऑनलाइन स्पेक्ट्रम २०२० स्पर्धेत प्रथम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:22 IST

 हब ऑफ लर्निंग उपक्रमांतर्गत सेंट्रल बोर्ड माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) ने मुंबई प्रदेशातील संलग्न शाळांमध्ये “स्पेक्ट्रम २०२०” हा कार्यक्रम आयोजित केला.

 डोंबिवली - मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कल्याण यांनी आंतरशालेय ऑनलाईन स्पर्धांमध्ये विविध स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील ७ बक्षिसे जिंकून प्रथम क्रमांक पटकाविला. हब ऑफ लर्निंग उपक्रमांतर्गत सेंट्रल बोर्ड माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) ने मुंबई प्रदेशातील संलग्न शाळांमध्ये “स्पेक्ट्रम २०२०” हा कार्यक्रम आयोजित केला.  सीबीएसईच्या या उपक्रमास विद्यार्थ्यांना परस्परसंवादी आणि कोविड-१९  साथीच्या आजाराची जाणीव करून देणे आणि नागरिकांमध्ये त्यांची सर्जनशीलता दाखवून जागरूकता निर्माण करणे हे लक्ष्य दिले गेले. या स्पर्धेचे आयोजन मुंबई विभागातील सीबीएसई शाळांकरिता डीएव्ही पब्लिक स्कूल, ऐरोली यांनी केले होते.  या अंतर्गत चित्रकला, पोस्टर मेकिंग, पाठ, निबंध लेखन व विविध वयोगटातील संगीत व्हिडिओ या स्पर्धा घेण्यात आल्या.  मध्य रेल्वे शाळेने डीएव्ही पब्लिक स्कूल, ऐरोलीसह या स्पर्धेत अव्वल स्थान मिळविण्याकरिता सात बक्षिसे जिंकली आहेत. पोस्टर मेकिंगमध्ये रचना श्रीवास्तव प्रथम, छत्री चित्रकला मध्ये रोशनी श्रीवास्तव प्रथम, छत्री चित्रकला मध्ये दिव्या पोट्टी व आर्यन गवळी द्वितीय, निबंध लेखनात स्पंदन बोले द्वितीय, निबंध लेखनात शंभवी यादव तृतीय व पठण स्पर्धेत ज्योती श्रीवास्तव यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीसे जिंकली आहेत. दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात मध्य रेल्वे शाळेतील मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि शाळेचे नाव गौरवान्वित केले.  गौतम जाधव यांचा मुलगा  संकेत जाधव, २०२० च्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९७.६% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांकावर आला. त्याचप्रमाणे कल्याण येथील वरिष्ठ अभियंता मास्टर रुबाब जकेरिया यांचा मुलगा मोहम्मद रबे २०२० सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ९४% गुण मिळवून शाळेत प्रथम आला. दोन्ही टॉपर्सनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या यशाचे श्रेय अनुभवी व समर्पित शिक्षकांना दिले. मुख्याध्यापक तसेच मध्य रेल्वे, मुंबई विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यात चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी रविवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले.

टॅग्स :Schoolशाळाkalyanकल्याण