शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काशिगाव पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 00:42 IST

दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना आहे . 

मीरारोड - १४ मार्च पासून नव्याने सुरू झालेल्या काशिगाव पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा १५ मार्च च्या मध्यरात्री दाखल झाला आहे . दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना आहे . 

भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट येथील जानकी हाइट्स मध्ये राहणारे गणेश हांडगर हे त्यांची आई व लहान मुलास घेऊन १४ मार्च रोजी गाडीने तुंगारेश्वर येथे दर्शनासाठी चालले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील  पाली विलेज हॉटेलच्या पुढे मागून गाडीतून आलेल्या मुस्कान उर्फ बेबी तिचा मित्र सलमान व फैजान यांनी हंडगर यांची गाडी अडवली . हंडगर व त्यांच्या आईने दाखल केलेले दोन गुन्हे मागे घेण्यास धमकावत दमदाटी व शिवीगाळ करत रॉड ने गाडीच्या काचा फोडून टाकल्या . तर सलमान याने बंदुकी सारखे दिसणारे हत्यार दाखवून हंडगर यांना जीवे मारण्यास धमकावले. वर्दळीच्या महामार्गवर हि घटना घडल्याने अन्य गाड्या थांबल्या तसेच परिसरात काम करणारे सुद्धा जमल्याने हल्लेखोर पळून गेले असे हंडगर यांनी म्हटले आहे . 

त्यांच्या फिर्यादीवरून काशिगाव पोलिसांनी मुस्कान , सलमान व फैजान वर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे हे तपास करत आहेत.  मुस्कान ही हंडगर यांची दुसरी पत्नी असून ती तिचा प्रियकर मित्र सलमान सह घरातील दागिने व रोग घेऊन पळून गेल्याबद्दल हंडगर यांनी तर मुस्कान हिने देखील हंडगर विरुद्ध नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :mira roadमीरा रोड