शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात अवैध रेती उपशाविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत पहिली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:17 IST

ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थानबद्ध करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आहे.

ठाणे दि ८ - ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थानबद्ध करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले आहे. अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्याने भविष्यात या कारवायांना वेसन बसेल, अशी आशा आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या बाबतीत अधिक कठोर कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्याबाबत चर्चा केली होती.

शिवाजी प्रेरणा सोसायटी, कोपरगाव, डोंबिवली पश्चिम येथे राहणारा हनुमान राजाराम म्हात्रे ही 51 वर्षीय व्यक्ती या कायद्यात स्थानबद्ध करण्यात आली असून, त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. धोकादायक व्यक्ती या शीर्षकाखाली पोलिस सातत्याने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करतात. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्ट‌िव्ह‌िटीज्-झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यानुसार ही कारवाई केली जाते. वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळ्यांना काबूत ठेवण्यासाठी पोलिसांना विशेष कायद्यांचा वापर करता येतो. या कायद्याच्या मदतीने पोलीस गुन्हेगारांच्या हालचाली नियंत्र‌ित करू शकतात. शारीरिक इजा आणि मालमत्तेच्या गुन्ह्यांसंदर्भात ही कारवाई होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवर एमपीडीएनुसार कारवाई झाली तर कोणत्याही सुनावणीविना त्यास एका वर्षासाठी जेलमध्ये बंद करता येते.

अवैध गौण खनिजांच्या संदर्भात उत्खनन व वाहतूक याविरुद्ध कल्याण, मोठा गाव, डोंबिवली खाडीमधून तसेच रेतीबंदर भागात गेल्या २ ते ३ वर्षांत ७२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे कल्याण तहसीलदार यांनी कल्याण पोलीस उपयुक्त परिमंडळ ३ यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यापैकी २४ गुन्हे अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई व्हावी असा आग्रह प्रशासनाने धरला आहे.