शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये माथाडी संघटनेच्या उपाध्यक्षांवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 04:46 IST

बदलापूरची घटना : थोडक्यात बचावले

बदलापूर : मागील अनेक दिवसांपासून शांत असलेले बदलापूर शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले. माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश कुडेकर यांच्यावर मंगळवारी सकाळी गोळीबाराचा प्रयत्न झाला. मात्र, सुदैवाने हल्लोखारांचे पिस्तुल न चालल्याने कुडेकर बचावले. मात्र यावेळी एक गोळी हवेत उडाल्याने परिसरात खळबळ उडाली.

तीन वर्षांपूर्वीच्या हत्या आणि गोळीबाराच्या प्रकरणानंतर बदलापूर शहरात शांतता होती. या वातावरणाला मंगळवारी अचानक गालबोट लागले. बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी भागात सकाळी दहाच्या सुमारास कुडेकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. शिवसेनाप्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष असलेले कुडेकर सकाळी आपल्या कार्यालयात जात असताना दबा धरून बसलेल्या दोन दुचाकीस्वारांनी कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुल न चालल्याने त्यांचा डाव फसला. या वेळी कुडेकर यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने ते रमेशवाडीच्या दिशेने गेले. मात्र काही सेकंदात ते पुन्हा कुडेकर यांच्याकडे आले आणि पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही गोळी सुटली नाही. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत तेथून पळ काढला. त्यामुळे कुडेकर थोडक्यात बचावले. याची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. कुडेकर हेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली.टोळीयुद्धाचा दाट संशयटोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करणारे आरोपी हे दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत की नाही याची माहिती पोलीस घेत आहे. दोघांनीही हेल्मेट घातल्याने त्यांची ओळख पटणे अवघड जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी