शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २०३ रुग्णालयांची अग्निसुरक्षा आता फुफाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 03:27 IST

सुरक्षा अहवाल सादर केलेच नाहीत : १८१ रुग्णालयांकडून नियमांचे पालन

ठाणे : मुंबईतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या मागील भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे महापालिका हद्दीतील ३८४ छोटीमोठी खाजगी रुग्णालये पुन्हा अग्निसुरक्षेच्या रडारवर आली होती. महापालिकेच्या मुख्य अग्निशमन विभागामार्फत त्यांच्या तपासणीचे निर्देश देऊन त्याचा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत १८१ रुग्णालयांनी आपले अहवाल सादर केले असून त्यांची अग्निसुरक्षा योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, उर्वरित २०३ रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रुग्णालयांनी अद्याप आपले अहवाल सादर केलेले नाहीत.

२५ ते ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेली रुग्णालये अग्निशमन विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, वापरात बदल अशा विविध कागदपत्रांच्या कात्रीत अडकली असून त्यांची त्यातून मुक्तता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.आरोग्य सेवा संचालनालयाने हॉस्पिटलची नोंदणी किंवा पुनर्नोंदणी करताना अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सक्तीचे केले असले, तरी नर्सिंग होम अ‍ॅक्टमध्ये अशी एनओसी किंवा वापरबदलाबाबतचा उल्लेख नाही. कायद्यातील याच मुद्यावर बोट ठेवून महापालिकेने शासनाच्या परिपत्रकाला यापूर्वीच केराची टोपली दाखवली आहे. त्यानुसार, एप्रिल २०१८ पासून ठाण्यातील रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ३८४ खाजगी रुग्णालयांची नोंदणी पूर्ण झाली आहे.आता पालिकेच्या कारवाईकडे लक्षमुंबईत कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ठाणे अग्निशमन दलाने शहरातील सर्वच रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणीसाठी केंद्रात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या कालावधीत आतापर्यंत ३८४ पैकी केवळ १८१ रुग्णालयांनी आपले अहवाल सादर केल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.हा अहवाल सादर केल्यानंतर अग्निशमन दलाने या रुग्णालयांची पाहणी करून त्याठिकाणी योग्य अशी सुरक्षा यंत्रणा आहे किंवा नाही, याची पडताळणी केली. ज्या ठिकाणी काही बदल करण्याची गरज होती, तिथे बदल करण्याच्या सूचना देऊन त्यांना नंतर ना-हरकत प्रमाणपत्र दिले. परंतु, हा नियम सर्वच रु ग्णालयांना लागू पडत असल्याने इतर रुग्णालयांनीही अशा प्रकारे अर्ज सादर करून पडताळणी करून घेण्याची गरज होती.मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या203रुग्णालयांबाबतीत महापालिका काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.यासंदर्भात अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत काळे यांच्याशी संपर्क साधला असता, जेवढ्यांनी अर्ज सादर केले होते, त्यांची तपासणी केली आहे. परंतु, शिल्लक राहिलेल्या रुग्णालयांच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभाग घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका