शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

आग लागली की लावली?

By admin | Updated: March 3, 2016 02:04 IST

नंडोरे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदामाला काल रात्री लागलेल्या आगीत विक्रीकर विभागाच्या (सेल टॅक्स विभागच्या) हजारो फायली जळून खाक झाल्या आहेत.

हितेन नाईक,  पालघरनंडोरे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदामाला काल रात्री लागलेल्या आगीत विक्रीकर विभागाच्या (सेल टॅक्स विभागच्या) हजारो फायली जळून खाक झाल्या आहेत. या दरम्यान गोदामाच्या पाठीमागे पेट्रोलने भरलेली बाटली मिळाल्याने ही आग हेतूपुरस्सर लावण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एखाद्या घोटाळ्यातील वादग्रस्त पुरावे नष्ट करण्यासाठीच तर ही आग लावली नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.पालघर मनोर रस्त्यावरील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम असून या गोदामात डिसेम्बर २०११ पासून सेल्स टॅक्स विभागाने आपल्या सन २००५ पासूनच्या जुन्या हजारो महत्वपूर्ण फायली १२ रुपये ६५ पैसे प्रती चौ. फुट दराने भाड़े तत्वावर ठेवल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला शालेय पोषण आहार योजने च्या इस्कॉन चा २ हजार ४९८ पोती तांदूळ मागील दीड वर्षांपासून ठेवण्यात आल्याची माहिती वखार महामंडळाचे कनिष्ठ अधिक्षक विवेक खैरे यांनी दिली.काल रात्री ७.५० वाजता वखारीला आग लागल्या नंतर एकच गोंधळ निर्माण झाला. ८ वाजून १७ मिनिटांनी पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागला कळविण्यात आले. त्यांनी तत्काल आगीवर पाण्याचा मारा सुरु केला. परंतु या गोदामाच्या दोन्ही बाजूने आग लागल्याने व एका बाजूला इस्कॉनच्या तांदळचा मोठा साठा असल्याने तो वाचविणे महत्वाचे होते. या वेळी लीडिंग फायरमेन अभिषेक गावंनकर, कानीफनाथ आरेकर, रुचित दवणे, नितेश भोईर, तेजस तांडेल, विकास गावित, निकेत पाटिल, योगेश दिवा, गणेश दिवा, शरद तांडेल इ. टीमने प्रयत्नांची शर्थ करुन शटर तोडून आत प्रवेश करुन आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर एमआयडीसीतून रात्री ११ वाजता अग्निशमनच्या दोन गाडया आल्यात. नंतर आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविणे शक्य झाले.वखारीला आग लागल्या नंतर पालघरचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत बजबले इ.नी घटना स्थळी भेट दिली असता या वखारीमध्ये विद्युत पुरवठा नसतांना आग कशामुळे लागली हा प्रश्न पोलिसांना भेडसावत असतांनाच त्यांना अर्धा लीटर पेट्रोलची बाटली घटनास्थळी सापडल्याने ही आग कोणीतरी हेतुपुरस्सर लावली असावी या संशयाला बळकटी मिळते आहे. दुपारी ३.३० वाजे पर्यंत आग धुमसत होती. सेल्स टॅक्स विभागाच्या माझगांव, ठाणे, पालघर इ. कार्यालयाच्या सन २००५ दरम्यांनच्या विविध प्रकारच्या फाइल्स ठेवण्यात आल्या होत्या. काल सेल्स टॅक्सच्या २ अधिकाऱ्यांनी या वखारीला संध्याकाळी भेट ही दिल्यानंतर ही माहिती पुढे येत असून त्या नंतर सुरक्षा रक्षक ठेवण्याची काळजी घेतली नसल्याने या प्रकरणातील बेपर्वाई दिसून येत आहे. या प्रकरणी वखार महामंडळ आणि सेल्स टॅक्स विभाग एकमेकाकड़े बोट दाखविण्यात धन्यता मानीत आहेत. त्यामुळे ही आग लावण्या मागे कुणाचा काही हेतू होता का? या फाइलींमधील माहितीमुळे एखादा अधिकारी अथवा क्लायंट अडचणीत येणार होता का?, एखादा गैरव्यवहार उघडकीस येणार होता का? असे प्रश्न समोर येत आहेत.