शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘खडी खदाण’ ची आग अजूनही धुमसतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:16 IST

धुराचे साम्राज्य : अग्निशमन दलाकडून २० तासांपासून प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : खडी खदाण येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासांपासून प्रयत्न करीत आहेत. आगीने कॅम्प नं ५ परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.खडी खदाण येथील डम्पिंग ग्राउंडवर उंचच उंच कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून महापालिका पर्यायी डम्पिंग जागेच्या शोधात आहेत. दरम्यान बुधवारी सायंकाळी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला आग लागल्याने परिसरात आगीने धुराचे साम्राज्य निर्माण झाले. महापालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी डम्पिंग ग्राउंडकडे धाव घेऊन आगीचा आढावा घेतला. अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासांपासून डम्पिंगला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग आटोक्यात केव्हा येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

महापालिकेने गेल्या महिन्यात डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे सपाटीकरण करण्याचा ठेका खासगी कंपनीला देऊन जेसीबीसह अन्य मशीन घेण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यावर ७५ लाखांचा जास्तीचा खर्च महापालिका करणार आहे. एकीकडे शहरातील कचरा उचलणे, डम्पिंगवरील कचऱ्याचे सपाटीकरण करणे, शहरातील डेब्रिज उचलणे आदींवर कोट्यवधींचा खर्च करूनही कचऱ्याचा प्रश्न जैसे थे आहे. महाशिवरात्रीमध्ये कचऱ्याचे ढीग साचू नये म्हणून डम्पिंगला आग लागलेली असतानाही कचरा उचलण्याचे काम कोणार्क कंपनीने सुरू ठेवले आहे. एकूणच कचऱ्याच्या नावाने काहीजण स्वतःचे चांगभले करून घेत असल्याची टीका सर्वत्र होत आहे. पालिकेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

डम्पिंगवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोधखडी खदान येथे कचरा टाकण्यास पहिल्या दिवसांपासून स्थानिक नागरिक व नगरसेवक विरोध करीत आहेत. येथील डम्पिंग हटविण्यासाठी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, उपोषण,   महासभेत आंदोलन करून विरोध दर्शविला. डम्पिंगवरील कचऱ्याच्या आगीने विरोध तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणे