शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन परवाना, सेवाशुल्कात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:48 IST

स्थायी समितीची मंजुरी : महापालिका हद्दीत मिळणार नि:शुल्क सेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील वाढती लोकसंख्या आणि विकास यामुळे अग्निशमन यंत्रणा सक्षम होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या सेवा आणि परवाना शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये बुधवारी मंजूर करण्यात आला. महापालिका कार्यक्षेत्रातील निवासी भागात ही सेवा नि:शुल्क असेल, असे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

केडीएमसीच्या अग्निशमन दलाचे सेवाशुल्क व कराचा दर हा २००५ पासून प्रचलित आहे. त्यानंतर, कोणतीही वाढ केलेली नाही. पलावा सिटी येथे अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करण्याचे प्रलंबित असून टिटवाळा येथेही अग्निशमन केंद्र सुरू होणे अपेक्षित आहे. आधारवाडी केंद्रातून टिटवाळा येथे पोहोचण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, नवीन केंद्र सुरू झाल्यास सध्याच्या पाच कोटींच्या वेतनात दोन कोटींची भर पडणार आहे. २०१५ मध्ये महापालिकेने आग विझवण्यासाठी ५५ मीटरची टर्न टेबल लॅडर्स खरेदी केली. विकासाचा वाढता दर, वाढणारी इमारतींची संख्या पाहता सक्षम सेवा देण्यासाठी उत्पन्नही वाढले पाहिजे. त्यानुसार, सेवाशुल्क व करवाढीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या वतीने अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी सादर केला होता.महापालिका हद्दीत अग्निशमन सेवा नि:शुल्क असेल, मात्र हद्दीबाहेरच्या निवासी भागासाठी प्रतितास ९०० रुपये, तर अनिवासी भागासाठी प्रतितास दोन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर, टर्न टेबल ५५ मीटर लॅडरचे शुल्क दुपटीने वाढवून ३५ हजार रुपये करण्यात आले आहे. प्रतिवाहन शिफ्टनुसार ते आकारले जाणार असून यापूर्वी हे शुल्क १७ हजार ५०० रुपये होते.किती शुल्क मोजावे लागणार?च्निवासी इमारती : तळ अधिक सात मजल्यांच्या निवासी इमारतींसाठी अग्निशमन परवाना शुल्क २० हजारांवरून ४० हजार रुपये केले आहे. १५ मजल्यांच्या इमारतीसाठी एक लाखावरून एक लाख २५ हजार रुपये आकारले जाणार आहेत. २३ मजली इमारतीसाठी एक लाखाऐवजी पाच लाख २५ हजार रुपये आकारले जाणार आहेत. ३० मजली इमारतीसाठी एक लाखावरून सात लाख ५० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.च्अनिवासी इमारती : १५ मीटरसाठी ५० हजारांवरून ७५ हजार, २४ मीटरसाठी ५० हजारांवरून एक लाख, ४५ मीटरसाठी ५० हजारांवरून एक लाख २५ हजार आणि ७० मीटरसाठी ५० हजारांवरून एक लाख ५० हजार रुपयांपर्यंत शुल्कवाढ करण्यात आली आहे. औद्योगिक इमारती, पेट्रोलपंप त्यात एलपीजी, सीएनजी यांच्यासाठी ५० हजारांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण