शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दल म्हणते, कबुतर उडाले भुऽऽर्र!प्रत्यक्षदर्शी म्हणतात, उशीर झाल्याने गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 06:20 IST

रविवारी सकाळच्या थंडीत ठामपाच्या बाळकुम अग्निशमन दलाचा फोन खणखणला... ‘साहेब, विजेच्या खांबावर एक कबुतर अडकले आहे.’

विशाल हळदे / पंकज रोडेकर लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रविवारी सकाळच्या थंडीत ठामपाच्या बाळकुम अग्निशमन दलाचा फोन खणखणला... ‘साहेब, विजेच्या खांबावर एक कबुतर अडकले आहे.’ अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच कबुतराच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. साडेतीन तासांनंतर या मुक्या जीवाची सुटका झाल्याचा दावा अग्निशमन दलाने केला असून प्रत्यक्षदर्शींनी मात्र सुटकेसाठी उशीर झाल्याने कबुतराचा जीव गेल्याचे सांगितले आहे.पोखरण रोडवरील सुभाषनगर येथील रस्त्यालगत असलेल्या एका विजेच्या खांबाच्या टोकाला कबुतर अडकले होते. सुटकेसाठी ते जीवाचा आटापिटा करत असल्याचे एका दक्ष नागरिकाने पाहिले. त्याने अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यानुसार, बाळकुम अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेतली. त्या वेळी कबुतराचे दोन्ही पाय मांज्यामध्ये अडकल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला चाकू बांधलेल्या लांब काठीच्या साहाय्याने कबुतराला सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यामध्ये यश आले नाही. कबुतराची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या मोठ्या गाडीचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, बाळकुम अग्निशमन दलाकडे ही गाडी उपलब्ध नसल्याने त्यांनी ८ च्या सुमारास वागळे इस्टेट अग्निशमन दलाशी संपर्क साधून त्यांची मदत मागितली. मात्र, वागळे इस्टेट अग्निशमन दलाची मोठी गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत जवळपास ९.१५ वाजले होते. या मोठ्या गाडीने जवानांचे काम सहज झाले. कबुतराची सुटका केल्यानंतर त्याने लगेच आकाशात भरारी घेतल्याचा दावा बाळकुम अग्रिशमन दलाचे उपस्थानक अधिकारी डी.एम. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटना समजल्यानंतर अग्निशमनने तातडीने धाव घेतली; पण त्यांच्या प्रयत्नांना उशीर झाला. कबुतराची सुटका झाली तेव्हा ते निपचित होते.

टॅग्स :thaneठाणे