शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अंबरनाथ, बदलापूरमधील कारखान्यांमध्ये फायर ऑडिट केवळ नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 23:09 IST

नियमानुसार अग्निशमन विभागाच्या माध्यमातून सेफ्टी ऑडिट होणे बंधनकारक असले तरी आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याने अग्निशमन विभाग चुकीच्या पद्धतीने सुरक्षेची चाचणी करीत आहेत.

अंबरनाथ शहर हे औद्योगिक शहराच्या नावाने या आधीपासूनच नावारूपाला आले आहे. या शहरात एक हजाराहून अधिक कारखाने असले तरी त्या कारखान्यांच्या सुरक्षेबाबत एमआयडीसी आणि त्यांचे अग्निशमन दल गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. नियमानुसार अग्निशमन विभागाच्या माध्यमातून सेफ्टी ऑडिट होणे बंधनकारक असले तरी आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याने अग्निशमन विभाग चुकीच्या पद्धतीने सुरक्षेची चाचणी करीत आहेत. त्यामुळे आगीच्या घटना घडल्यावर कारखान्यातील अग्नीसुरक्षा यंत्रणा कूचकामी ठरते.मोरीवली, वडवली आणि चिखलोली एमआयडीसी असे तीन रासायनिक पदार्थांवर प्रक्रिया करणारे केमिकल झोन आहेत. आगीच्या घटना सर्वाधिक प्रमाणात या क्षेत्रातच लागत असल्याने त्यांची आग प्रतिबंधक यंत्रणा सक्षम आहे की नाही याची चाचपणी करण्याचे अधिकार एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला आहे. मात्र एमआयडीसीचे अधिकारी आणि कारखानदार यांच्यात लागेबांधे असल्याने यंत्रणेकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवीन कारखाना निर्माण झाल्यावर वर्ष-दोन वर्ष नीटनेटकेपणाने अग्नीसुरक्षेकडे लक्ष दिले जाते, मात्र त्यानंतर काही त्रुुटी आढळल्या तरी एमआयडीसीचे अधिकारी त्याकडे गांभीर्याने बघत नाहीत. अनेक आगीच्या घटना पाहिल्यावर एक बाब प्रकर्षाने जाणवते की एका कंपनीची आग भडकल्यावर त्याचा फटका शेजारी असलेल्या इतर कंपन्यांनाही बसतो.मूळात एमआयडीसीचे प्लॉट देत असताना दोन कंपन्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याची कोणतीही पद्धत नसल्याने अपघातांची मालिका वाढत आहे. अंबरनाथच्या वडवळ एमआयडीसी भागात अनेक रासायनिक कारखाने असल्याने त्याठिकाणी सुरक्षेची चाचपणी योग्य प्रकारे होणे अपेक्षित आहे. मात्र त्याठिकाणीही सुरक्षेच्या उपाययोजना दुर्लक्षित केल्या आहेत. अनेक कारखान्यांमधील विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करण्याची गरज असताना ते काम नियमतिपणे केले जात नाही. सोबत रासायनिक कारखान्यात ड्रायर आणि बॉयलर यांचा सर्वाधिक धोका असतानाही त्यांच्या देखभाल दुरु स्तीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. जुन्या यंत्रणा सातत्याने चालविण्यात येत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. यासोबत अनेक रासायनिक कारखान्यात योग्य प्रशिक्षण घेतलेले कामगार नसल्याने माणसाच्या चुकीमुळेही आगीच्या घटना घडतात. आगीच्या घटनांमध्ये कंपनीतील अग्नीविरोधी यंत्रणा सक्षम असेल तर ती आग लागलीच आटोक्यात आणणे शक्य आहे. मात्र ती यंत्रणा चालवणारे कामगारच प्रशिक्षित नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत कामगार सुरक्षितस्थळी जाण्याकडे प्रथम प्राधान्य देतात. त्यामुळे वेळेत आग आटोक्यात आणणे शक्य होत नाही. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे संबंध असल्याने ठेकेदार सांगेल त्या पद्धतीनेच काम करतात. फायर सेफ्टीची चाचपणी करण्यासाठी अधिकारी आल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सोय करणे एवढ्यापुरतेच काम केले जाते, असे येथील वास्तव आहे.आग विझवण्यासाठी पाण्याची कमतरताअंबरनाथच्या तुलनेत बदलापूरमध्ये कारखान्यांची संख्या कमी असली तरी केमिकल झोन मोठ्या प्रमाणात असल्याने त्याठिकाणीही आगीच्या घटना घडतात. आगीची घटना घडल्यावर अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहचत असले तरी पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यात अनेक अडचणीही येतात. बदलापूरही आगीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी फायर सेफ्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे असे चित्र निर्माण होत आहे.

टॅग्स :fireआग