शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपनीचे बनावट पत्रे विकणाऱ्या व्यापार्‍याविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:59 IST

बनावट पत्र्यांवर नामांकित कंपनीचे शिक्के मारून ते विकणार्‍या एका व्यापार्‍याविरूद्ध ठाण्यातील राबोडी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे४ लाख ६१ हजाराचा माल हस्तगतराबोडी पोलिसांची कारवाईकॉपीराईट अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल

ठाणे : बनावट पत्रे विकणार्‍या एका व्यापार्‍याविरूद्ध राबोडी पोलिसांनी मंगळवारी कॉपीराईट अ‍ॅक्टअन्वये कारवाई केली. त्याच्याकडून ४ लाख ६१ हजार माल पोलिसांनी हस्तगत केला.झरार नसीबउल्ला खान हे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. राबोडी येथील शिवाजी नगरात राहणार्‍या या आरोपीचे हरिदास नगरात गोल्डन टिंबर ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. जेएसडब्ल्यू कंपनीचे बनावट पत्रे तो विकत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. कंपनीने या माहितीची खातरजमा केल्यानंतर राबोडी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव यांनी या व्यापार्‍याविरूद्ध कारवाई केली. राबोडी पोलीस आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकार्‍यानी झरारच्या दुकानातील पत्रे तपासले असता, त्यावर कंपनीचे शिक्के होते. मात्र हे पत्रे कंपनीचे नसल्याचे जेएसडब्ल्यूच्या अधिकार्‍यानी सांगितल्यानंतर दुकानातील ४ लाख ६१ हजार १00 रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला. कंपनीचे कर्मचारी पियुष यशवंत राऊत यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरूद्ध कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ च्या कलम ५१, ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने माल कुठून आणला याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बनावट पत्र्यांवर त्याने स्वत: जेएसडब्ल्यू कंपनीचे शिक्के मारले किंवा त्याला या बनावट मालाचा आणखी कुणी पुरवठा केला याचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी महेश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस