शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग अनुभव प्रतिष्ठानचा तिसरा वर्धापन दिन संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 18:54 IST

उद्योग अनुभव प्रतिष्ठानचा तिसरा वर्धापन दिन गडकरी रंगायतन येथे रविवारी सकाळी पार पडला.

ठाणे : उद्योग अनुभव प्रतिष्ठानचा तिसरा वर्धापन दिन गडकरी रंगायतन येथे रविवारी सकाळी पार पडला. यावेळी उद्योग भूषण प्रथम पुरस्कार राजेंद्र आळशी, द्वितीय पुरस्कार अनिल घुबे, तृतीय पुरस्कार मुकुंद राक्षे, उद्योग दीप्ति एन. आर.आय. पुरस्कार पूर्णिमा कामत, उद्योग दीप्ति प्रथम पुरस्कार शरयु देशमुख, द्वितीय पुरस्कार निवेदिता रानडे यांना गौरविण्यात आले.    यावेळी उद्योग अनुभव पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जागतिक चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष खा. शिवाजीराव पाटील, विशेष अतिथी म्हणून सिंगापूरचे उद्योजक हर्षवर्धन भावे, प्रमुख पाहुणे म्हणून कॉटन किंगचे एम.डी. प्रदीप मराठे, बेडेकर मैनेजमेंट कॉलेजचे नितीन जोशी तसेच, पिताम्बरीचे रवींद्र प्रभुदेसाई, सुश्रेय प्रकाशनच्या श्वेता गानु व इतर उपस्थित होते.यावेळी भावे यानी लघु उद्योजकाना मार्गदर्शन केले. तुमच्या पाल्याप्रमाणे तुमचा व्यवसाय संभाळा, व्यवसाय कधी थांबवू नका, तो पुढे चालूच ठेवा असा सल्ला त्यांनी दिला. खा. पाटील म्हणाले की, उद्योग हा शिकवून येत नसतो तर तो नैचरली किंवा मनात आले कि होतो, त्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो असे मला तरी वाटत नाही, जे काही कराल त्यात उदयोग, उद्योजकशीलता असावी, उद्देश ठेवाल तर यशस्वी व्हाल असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. कोणताही व्यवसाय करा त्याशी प्रामाणिक रहा, बंधीलकी ठेवा असही त्यांनी सांगितले.दरम्यान, पूर्वा कर्वे यानी उद्योग भूषण व उद्योग दीप्ति पुरस्काराने सन्मानित झालेल्या सत्कार मूर्तिंची मुलाखत घेतली. यावेळी उद्योग सुरु करताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, मिळालेले मार्गदर्शन आणि यश हा प्रवास उलगडन्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन दिपाली केळकर यानी केले.

टॅग्स :thaneठाणे