शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांची कामे मुदतीपूर्वीच पूर्ण करा - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:36 IST

अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा हातखंडा आहे.

कल्याण : अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा हातखंडा आहे. सहापदरी रस्ता तसेच वाहतूकदृष्ट्या अत्यंत निकडीच्या असलेल्या पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान ‘एमएसआरडीसी’ने स्वीकारावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या आणि नवीन पत्रीपुलाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे, आमदार सुभाष भोईर, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ पलावा जंक्शन येथे झाला. त्यानंतर, नव्या पत्रीपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. याच ठिकाणी मुख्य कार्यक्रम पार पडला. दरम्यान, वाहतूककोंडीमुळे पालकमंत्र्यांना कल्याण फाट्यापासून सोनारपाडापर्यंत विरूद्ध दिशेने वाहन चालवून कार्यक्रमस्थळी पोहोचावे लागले. त्यामुळे पालकमंत्र्यांनीच नियम तोडल्याची चर्चा सुरू होती.शिंदे म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीसह अन्य बाजूच्या शहरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असून अनेक आंदोलनेही झाली. दरम्यान, हे दोन्ही प्रकल्प महत्त्वपूर्ण असून त्यामुळे निश्चितच वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. तीस महिन्यांत सहापदरी रस्ता, तर आठ महिन्यांत पत्रीपूल पूर्ण केला जाणार आहे. मात्र, एमएसआरडीसीने त्याहीपेक्षा लवकर हा पूल बांधण्याचा प्रयत्न करावा, असे शिंदे म्हणाले. एमएसआरडीसीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून नागपूर-मुंबई हे ७०० किलोमीटरचे १० ते १५ तासांचे अंतर सहा तासांवर येणार आहे. ठाणे-बोरिवली हे दोन तासांचे अंतर एका बोगद्याच्या माध्यमातून १० मिनिटांत कापले जाणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. राज्यमंत्री चव्हाण यांनीही या प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर व्हावीत, अशी सूचना केली. दरम्यान, सहापदरी रस्त्यामुळे बाधित होणारे जमीनधारक, शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णय घेण्याआधीच भूमिपूजनाच्या कामाचा घाट घातल्याचा आरोप करत भूमिपुत्रांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केली. आधी मोबदला द्या, मगच कामाला सुरुवात करा, अशी मागणी त्यांनी केली. शिष्टमंडळातर्फे पालकमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. त्यावर भूमिपुत्रांना मोबदला मिळेल. भूमिपुत्रांच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी समितीकमिटी स्थापन केल्याचे शिंदे यांनी सांगितले.‘ती’ मार्गिका चुकीचीनुकत्याच पार पडलेल्या मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात राज्यमंत्री चव्हाण यांनी डोंबिवली मेट्रोची मागणी केली होती. त्याबाबत बोलताना भोईर यांनी, मेट्रोच्या मार्गात दाखवण्यात आलेली मार्गिका चुकीची आहे.त्याचा संबंधितांना फायदा होणार नाही, असा टोला चव्हाणांना लगावला. यावर जास्तीतजास्त प्रवाशांना फायदा होईल, त्याच मार्गाने मेट्रो नेण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, असे चव्हाण यांनी उत्तर दिले.तर, प्रस्तावित कल्याण मेट्रो ही तळोजाहून शीळफाटामार्गे आली पाहिजे. तसेच बिर्ला कॉलेजमार्गे ही मेट्रो नेण्याबाबतही आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे