शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा

By धीरज परब | Updated: July 3, 2024 11:42 IST

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर २०२२ मध्ये रस्त्यावरील एका श्वानास लाथ मारून त्याची हत्या केली गेली होती.

मीरारोड - रस्त्यावरील एका भटक्या श्वानास लाथ मारून त्याची हत्या केल्या प्रकरणी आरोपीला ठाणे जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत दंड वा तुरुंगवास  अशी शिक्षा ठोठावली आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्या नुसार आरोपीला शिक्षा झाल्याचे प्रकार खूपच कमी आहेत. 

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर २०२२ मध्ये रस्त्यावरील एका श्वानास लाथ मारून त्याची हत्या केली गेली होती. पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा व भादंवि नुसार  गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्या प्रकरणी वरिष्ठांनी तपासाची जबाबदारी  पोलीस हवालदार गंभीरराव राऊत यांच्यावर सोपवली होती. 

आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सह लोकांची चौकशी पोलिसांनी सुरु केली. त्यात श्वानास लाथ मारणारा हा कैलास इलाकर सिंग हा आरोपी असल्याचे आढळून आले. या शिवाय पोलिसांना काही साक्षीदार तपासले. दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात सरकारी वकिलाच्या साहाय्याने बाजू मांडली. तपास अधिकारी यांनी केलेला सखोल तपास, फिर्यादी, पंच आणि साक्षीदार यांच्या साक्षीवरून कैलास सिंग विरुद्धच्या सबळ पुराव्यामुळे न्यायदंडाधिकारी आर.आर. भगत यांनी आरोपीला प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा नुसार दोषी ठरवत ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवसांची कैद तसेच भादंवि नुसार  ३० हजार रुपये दंड किंवा दंडाची रक्कम न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या बाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :mira roadमीरा रोडdogकुत्रा