शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंड्यांचे आर्थिक थर कोसळणार

By admin | Updated: July 29, 2015 00:05 IST

ठाणे शहराची नवीन ओळख दहीहांडीचे ठाणे अशी निर्माण झाली आहे. मात्र, हंडींच्या उंचीवर आलेली मर्यादा आणि रस्त्यावरच्या उत्सवांवरील बंदी त्याचबरोबर आवाजाची मर्यादा

ठाणे : ठाणे शहराची नवीन ओळख दहीहांडीचे ठाणे अशी निर्माण झाली आहे. मात्र, हंडींच्या उंचीवर आलेली मर्यादा आणि रस्त्यावरच्या उत्सवांवरील बंदी त्याचबरोबर आवाजाची मर्यादा यामुळे दहीहांडीचा उत्सव साजरा कसा होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे ठाण्यासह इतर भागातील ४ हजारांहून अधिक दहीहंडी आयोजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर होणाऱ्या या आयोजनांमधून अनेक गोविंदा मंडळांचे आर्थिक गणित जोडले गेल्याने या दहीहंड्या रद्द झाल्यास गोविंदांचे आर्थिक थर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्यातील ओपन हाऊस, टेंभी नाका, जांभळी नाका, कळवा नाका, शास्त्रीनगर नाका यांचे आयोजन रस्त्यावरच होते. या हंड्याच्या आयोजनामध्ये राजकीय आयोजकांचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. हे उत्सव आयोजित करणारे मोठ्या प्रमाणात वर्गण्या गोळा करीत असतात. या उत्सवांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थकारण निर्माण होत असते. रस्त्यावर होणाऱ्या लहानमोठ्या दहीहंडी आयोजनांचा थेट संबंध गोविंदा मंडळांच्या आर्थिक उलाढालीशीही आहे. हंडींच्या बक्षीसांवर अनेक गोविंदा मंडळांचे शैक्षणिक, आरोग्यविषयक विविध वार्षिक उपक्र म ठरतात. त्यामुळे त्याचा थेट परिणाम या उपक्रमांवरही होण्याचीही शक्यता आहे. शिवाय, अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे आर्थिक गणितेही दहीहंडीतून मिळणाऱ्या पैशात गुंतलेले असते. शिवाय, डीजे, ध्वनिक्षेपक, बिगारी, माथाडी कामगार आदींनाही या ठिकाणी व्यवसाय मिळत असतो. तो आता बंद होणार आहे. मिळणाऱ्या वर्गण्याही आयोजकांना घेता येणार नाहीत. त्यामुळे आयोजनाचे आर्थिक थर कोसळणार असल्याचे चित्र आहे. टेंभी नाक्यावरील सायलेन्स झोनचे काय? टेंभी नाका, जांभळी नाका, चरई हा एक किलोमीटरचा परिसर सायलेन्स झोनमध्ये येत आहे. न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा आणि जिल्हा शासकीय रु ग्णालय या परिसरात आहे. मात्र, या भागातील आवाजाच्या निर्बंधांची कधीच काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. टेंभी नाका येथे दिहहंडी आणि नवरात्रोत्सव मोठ्या गाजावाजामध्ये सुरु असतो. तर, जांभळी नाका येथेही चैत्री नवरात्रोत्सव आणि दिहहंडी मोठ्या आवाजामध्ये सुरु असते. दुसरीकडे आंबेडकर रोड परिसरातही दिहहंडी उभारण्यात येत असते. या भागातील सायलेन्स झोनचे निर्बंध कधीच शिथील केले जात नाहीत. तरीही, या ठिकाणी उत्सव साजरे होत असतात. त्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी काय कारवाई करणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.