शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या नळजोडण्या शोधण्यासाठी अखेर मीरा-भाईंदर महापालिकेने नेमली पथके  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 16:10 IST

मीरा भाईंदर शहर हे अनधिकृत नळजोडण्या साठी नेहमीच वादग्रस्त ठरले आहे.

मीरा रोड - मीरा भाईंदर मध्ये तांत्रिक कारणांनी पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन उद्भवलेल्या पाणीटंचाई व त्यावरील राजकीय आंदोलनांच्या अनुषंगाने महापालिकेने आता शहरातील अनधिकृत नळ जोडण्या शोधून काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे पथके नेमली आहेत. 

मीरा भाईंदर शहर हे अनधिकृत नळजोडण्या साठी नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात चोरीची नळकनेक्शन घेण्यात आल्याचे सातत्याने समोर आले आहे. परंतु चोरीच्या नळ जोडण्या सापडून देखील तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे नाळ जोडण्या घेण्याचे असंख्य प्रकार होऊन देखील सरसकट गुन्हे दाखल करण्यास मात्र कमालीची टाळाटाळ सुरूच आहे . त्यामुळे अनधिकृत नळ जोडण्या आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या नळ जोडण्यां प्रकरणी महापालिका प्रशासन व नगरसेवक, राजकारणी यांची भूमिका संशयास्पद आहे. 

चोरीच्या नळ जोडण्या दंड आकारून अधिकृत करण्याचा खास शासन आदेशातील कालमर्यादेचा सुद्धा भ्रश्टहेतूने जाणीवपूर्वक उल्लंघन करून चोरीच्या नळ जोडण्या अधिकृत केल्या गेल्या आहेत . अनधिकृत नळ जोडण्याचा दंड व कारवाई टाळण्यासाठी चक्क नवीन नळ जोडण्या म्हणून नोंदीच्या गंभीर प्रकारांना पाठीशी घातले गेल्याचे आरोप नवीन नाहीत. त्यातच आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याने तांत्रिक कारणांनी उद्भवलेल्या पाणी टंचाईला राजकीय मुद्दा बनवून सर्वच पक्षांनी आपली राजकीय पोळी पोलीस व पालिकेच्या साक्षीने भाजून घेण्याचा प्रयत्न केला . यावेळी चोरीच्या नळ जोडण्यांचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. 

अनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देश नुसार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी शुक्रवारी कार्यालयीन आदेश काढून अनधिकृत नळ जोडण्या शोधून काढण्यास कळवले आहे. त्यासाठी पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंते , लिपिक , मेस्त्री , मीटर वाचक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे . विभाग निहाय पथके नेमली असून त्यांनी निवासी व अनिवासी अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून ७ दिवसात अहवाल सादर करायचा आहे. चुकीची वा खोटी माहिती दिल्यास त्या कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक ) नियम १९७९ नुसार कारवाईचा इशारा वाकोडे यांनी दिला आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक