शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सावित्रीबाई फुले नाट्यगृह डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार, केडीएमसी आयुक्त वेलारसू यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:29 IST

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कल्याण मधील अत्रे रंगमंदिर, व डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले कला मंदिर, हे दुरुस्ती करीता बंद ठेवण्यांत आलेले आहे. मात्र रंगकर्मी, नाटयरसिकांची मागणी विचारात घेवून सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकुलित यंत्रणेची तातडीने दुरुस्ती किंवा पयार्यी व्यवस्था करुन नाटयगृह खुले करण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी बुधवारी ...

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कल्याण मधील अत्रे रंगमंदिर, व डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले कला मंदिर, हे दुरुस्ती करीता बंद ठेवण्यांत आलेले आहे. मात्र रंगकर्मी, नाटयरसिकांची मागणी विचारात घेवून सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकुलित यंत्रणेची तातडीने दुरुस्ती किंवा पयार्यी व्यवस्था करुन नाटयगृह खुले करण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी बुधवारी दिले.मात्र नाटयगृह सुरु असताना वातनुकुलित यंत्रणेंत बिघाड झाल्यास प्रशासन याची जबाबदारी घेणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले असून याची नोंद नाटयरसिकांनी व रंगकर्मी यांनी घ्यावी असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले.अत्रे रंगमंदिर १ एप्रिलपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यांत आले आहे. गेल्या आठवड्यात सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती करणे करीता काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. नाटयरसिक व रंगकर्मी हे विविध नाटके व कार्यक्रमापासुन वंचित राहू नये म्हणुन सदरचे नाटयगृह हे तीन महिन्याकरीता बंद ठेवण्यांत येणार होते. परंतू नाटयरसिक,रंगकर्मी यांनी केलेली मागणी विचारात घेता डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकुलित यंत्रणा दुरुस्ती करुन किंवा पयार्यी व्यवस्था तातडीने करुन सदरचे कलामंदिर डिसेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ज्यांना नाटकाचे व इतर कार्यक्रमाचे बुकिंग करावयाचे असेल त्यांनी करावे.या संपूर्ण वातानुकुलित यंत्रणेकरीता दुरुस्तीसाठी काही आवधी लागणार आहे, त्यामुळे पयार्यी व्यवस्था म्हणून अत्रे रंगमंदिरातील काम तातडीने करण्यांत येवून आणि त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रंगमंदिर जानेवारी २०१८ ला सुरु करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. अत्रे रंगमंदिर सुरु झाल्यानंतर सावित्रीबाई फुले कलामंदिर वातानुकुलित यंत्रणा नव्याने बसविण्याकरीता जानेवरी ते फे्ब्रुवारी २०१८ दोन महिन्याच्या कालावधी करीता बंद ठेवले जाणार आहे असे देखील बैठकित स्पष्ट करण्यात आले.‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये सोमवारी आणि-मंगळवारी ‘सणासुदीला सांस्कृतिक ठणठणाट’ या मथळयाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची कल्याण-डोंबिवलीत महापालिकेसह सांस्कृति संस्था, मंडळ आदी ठिकाणी चर्चा झाली. त्यामुळे शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांनी तातडीने फुले नाट्यगृहाला भेट दिली. तसेच त्यानंतर तातडीने आयुक्तांना अहवाल दिला. वेलारसू यांनीही सर्व संबंधित यंत्रणांशी चर्चा करत नाट्यगृह सद्द:स्थितीत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. बहुतांशी सामाजिक संस्थांनी यासंदर्भात आवाज उठवल्याने ‘लोकमत’चे आभार मानले. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही लोकमत च्या वृत्तामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला असे सांगत रसिकांसाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाGovernmentसरकारentertainmentकरमणूक