शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अखेर रणजित कुमार स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:00 IST

ठाणे महापालिकेतील महासभेत ठराव मंजूर : सर्वपक्षीयांचा पाठिंबा, आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात कोरोनाचा वाढता कहर आटोक्यात आणण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेत आणखी एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. परंतु, १५-१५ दिवस ते हजरच नसल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केला. ते असून नसल्यासारखेच असल्याने त्यांना शासनाकडे पुन्हा पाठविण्याचा ठराव राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी मांडला, त्याला राम रेपाळे यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो मंजूर करण्यात आला.ठाण्यात कोरोनाचा कहर वाढत असताना मे महिन्यात यातून सावरण्यासाठी आणखी एका आयएएस अधिकाºयाची नियुक्ती करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने अखेर शासनाने ही विनंती मान्य करून मे महिन्यात आयएएस असलेले रणजितकुमार यांची नियुक्ती केली होती.दिवसेंदिवस ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे मुंबईत ज्या पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात पाच आयएएस अधिकारी घेण्यात आले होते, त्याच धर्तीवर ठाण्यातही अशा प्रकारे रणजित कुमार यांची नियुक्ती केली होती. परंतु,जेव्हापासून ते रुजू झाले तेव्हापासून त्यांच्याकडून आपल्या मर्जीप्रमाणो काम सुरू असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी शुक्रवारच्या महासभेत केला. त्यांच्याकडून परस्पर निर्णय घेतले जात होते, महापालिकेच्या इतर कोणत्याही अधिकाºयाला विश्वासात घेतले जात नव्हते. त्यातही कोरोनाच्या या महामारीत ते १५ ते २० दिवस हजरच नसायचे. आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे चांगल्या प्रकारे काम करीत आहेत.त्यामुळे आणखी आयएएस अधिकाºयाची गरज नसल्याचे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केले. अखेर मुल्ला यांनी, रणजित कुमार यांना शासनाकडे परत पाठवा, असा ठराव मांडला असता त्याला स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो मंजूर करण्यात आला.१५-२० दिवस हजर नसायचेमहापालिकेच्या कोणाही अधिकाºयाला विश्वासात घेतले जात नव्हते. त्यातही कोरोनाच्या या महामारीत ते १५ ते २० दिवस हजरच नसायचे. आयुक्त विपिन शर्मा हे चांगले प्रकारे काम करीत आहेत.