शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ आठ मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 06:02 IST

शीळ - डायघर येथील बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणा-या आठ मनसे पदाधिका-यांना अखेर मंगळवारी प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे : शीळ - डायघर येथील बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणा-या आठ मनसे पदाधिका-यांना अखेर मंगळवारी प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला विरोध करणाºया मनसे पदाधिकाºयांच्या जामीन अर्जावर सोमवारी होणारी सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. अखेर मंगळवारी ती होऊन त्यांना न्यायालयाने अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला.या पदाधिकाºयांनी ७ मे रोजी बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळले होते. सर्वेक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी मोजणीच्या मशीन्सदेखील फेकून दिल्या होत्या. या प्रकरणात रवींद्र मोरे, संदीप पाचंगे, पुष्कर विचारे, सागर जेधे, विनायक रणपिसे, जनार्दन खरीवले, शरद पाटील, कुशाल पाटील या जणांना शीळ डायघर पोलिसांनी ८ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर ९ मे रोजी त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर ११ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. ११ मे रोजी त्यांना पुन्हा कोर्टात हजर केल्यावर कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन त्यांची अटी व शर्तींसह प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर सुटका झाली. न्यायालयाने घातलेल्या अटींमध्ये कुठल्याही पुराव्यात अडथळा निर्माण करू नये, पोलीस तापासात सहकार्य करावे, खटला सुरू झाल्यावर पुढील तारखांना नियमित हजर राहावे या अटींवर त्यांना जामीन देण्यात आले असल्याचे अ‍ॅड. ओम्कार राजुकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे लवकरच त्यांची सुटका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.>आमच्या पदाधिकाºयांची सुटका झालेली आहे त्यामुळे याचा आनंद आहे. बुलेट ट्रेन विरोधी आंदोलन आता आणखी जोशात करणार आहे.- अविनाश जाधव, अध्यक्ष,ठाणे - पालघर जिल्हा

टॅग्स :MNSमनसे