शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
2
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
3
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
4
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
5
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
6
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
7
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
8
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
9
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
10
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
11
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
12
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
13
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
14
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
15
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
16
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
17
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
18
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
19
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
20
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद

जोगिला मार्केट भागातील १७५ बांधकामांवर अखेर पालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:32 IST

तलाव बुजवून त्याठिकाणी झालेली बांधकामे अखेर पालिकेने तोडण्याची कारवाई गुरवार पासून सुरु केली. येथील रहिवाशांना दोन महिने रेंटलच्या घरात त्यानंतर हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याची हमी पालिकेने दिली आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्यात १७५ बांधकामांवर कारवाईतलावाला दिली जाणार नवसंजीवनी

ठाणे - जोगीला तलावात भरणी टाकून त्याठिकाणी झालेली बांधकामे हटविण्याची कारवाई अखेर गुरवार पासून सुरु झाली. येथील रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. परंतु त्यांची मागणी विचारात न घेता पालिकेने ३०० पोलिसांच्याच बंदोबस्तात कारवाई सुरु केली. यामध्ये पहिल्या दिवशी १७५ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. ही कारवाई टाळण्यासाठी स्थानिकांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याचे आवाहन केले होते.

                  मागील दोन वर्षापासून सुरु झालेल्या कारवाई अंतर्गत ठाणे महापालिकेने शहरातील अनेक रस्ते, अतिक्रमणमुक्त केले आहेत. त्यानंतर मागील काही महिने थांबलेली ही कारवाई आता पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. परंतु या कारवाईला प्रथमच स्थानिक रहिवाशांनी विरोधाची भुमिका घेऊन ४८ तासांचे अल्टीमेंटम दिले होते. त्यानुसार रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु असे असतांना देखील गुरुवार पासून पालिकेने कारवाईला पुन्हा सुरवात केली. त्यानुसार उथळसर भागातील जोगीला मार्केट येथील तलाव बुजवून त्याठिकाणी झालेल्या बांधकामांवर पालिकेने हातोडा मारला. यावेळी सुरवातीला अनेक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. परंतु पोलिस बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई सुरु केली. त्यानंतर या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात देखील धाव घेण्यात आली. परंतु तो पर्यंत पालिकेच्या माध्यमातून रहिवाशांची घरे खाली करुन त्या घरांवर बुल्डोजर फिरविण्यात आला.दरम्यान, या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरुपात खेवरा सर्कल येथील रेंटलच्या नव्या इमारतीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यात त्यांना हक्काचे घर दिले जाईल असे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे तो पर्यंत या रहिवाशांकडून रेंटलच्या घरांचे कोणत्याही स्वरुपात भाडे घेतले जाणार नसल्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. परंतु तरी देखील निवारा हक्क समन्वय समितीच्या माध्यमातून ही कारवाई टाळण्यासाठी चव्हाण यांच्याकडे विनवनी करण्यात आली. परंतु तरी देखील ही कारवाई सुरुच होती. आता राहोत आहोत, त्यापेक्षा चांगले घर मिळणार म्हणून आणि हक्काचे घर जातेय म्हणून काही रहिवाशांच्या डोळ्यात आसु तर काहींच्या डोळ्यात हसू दिसत होते. भर उन्हातच ही कारवाई होत असल्याने अनेकांचे संसार एका क्षणात उघड्यावर आले.                      ही कारवाई करतांना पालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचा आरोपही रहिवाशांनी केला. परंतु ही कारवाई नियमानुसारच केली गेली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान दुपारी दिडच्या सुमारास आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कारवाईची घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. आता येथील बांधकामांवर कारवाई केल्यानंतर उर्वरीत १०० बांधकामांवर देखील दुसऱ्या टप्यात कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर येथील बुजविण्यात आलेल्या तलावाला नवसंजवणी दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त