शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अपघातग्रस्त ब्लेसिंग धक्याजवळ आणण्यात मच्छिमारांना यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 18:35 IST

१९ सप्टेंबरला मुसळधार पावसासह समुद्रात आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रात्री ८.३० वाजताच्या सुमारास समुद्रातील रेती सदृश छोट्या बेटावर चढुन पलटी झाली.

- राजू काळे 

भार्इंदर, दि. 21 - १९ सप्टेंबरला मुसळधार पावसासह समुद्रात आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रात्री ८.३० वाजताच्या सुमारास समुद्रातील रेती सदृश छोट्या बेटावर चढुन पलटी झाली. तीला अखेर २१ सप्टेंबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास धक्यालगत आणण्यात मच्छिमारांना यश आले. 

१९ सप्टेंबरला सुरु झालेल्या  वा-यासह मुसळधार पावसामुळे ही बोट उत्तन किना-यावरील नवी खाडी येथून चौक धक्यालगत सुरक्षित नांगरण्यासाठी जात होती. परंतु, जोरदार वादळी पावसामुळे बोटीचा तांडेल निलेश डिमेकर याला समुद्रातील रेती सदृश छोटे बेट न दिसल्याने त्या बेटावर बोट चढुन ती पलटी झाली. समुद्राला उधाण आल्याने तीला किना-यावर घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यातील खलाशांनी उत्तन किना-यावरील मच्छिमारांना संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. तसेच बोटीतील प्लास्टिकच्या कॅनद्वारे समुद्रात उड्या घेतल्या. पाण्याच्या प्रवाहामुळे ते वसई समुद्र किनारी जाऊ लागले. तेथील बॉबीलोन बोटीतील खलाशांनी त्यांना बोटीत घेतले. दरम्यान ती बोट किना-यावर नेण्यास खलाशांनी संपर्क साधलेले मच्छिमार त्या बेटालगत आले. परंतु, समुद्राला ओहोटी येण्यास सुरुवात झाल्याने त्यांना बोट आणण्यात अपयश आले. दुस-या दिवशी सकाळी ६ वाजता मिशन ब्लेसिंग सुरु झाले. तत्पुर्वी भरती सुरु झाल्याने बोटीत पाणी व माती साठू लागली. त्यातच ती पुर्णपणे उलटी होऊन समुद्रात बुडु लागली. परंतु, मच्छिमारांनी तीला वाचविण्यात यश मिळवुन चौक येथे आणण्याचा प्रयत्न केला. दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु असलेला हा प्रयत्न पुन्हा ओहोटीमुळे अर्धवट राहिला. त्यामुळे ब्लेसिंगला तेथील बोटींना दोरखंडाने बांधुन ठेवण्यात आले. २१ सप्टेंबरला पुन्हा सकाळी ६ वाजता मिशन ब्लेसिंग सुरु करण्यात आले. अखेर दुपारी १ वाजता तीला जेसीबी व अग्निशमन दलाच्या मदतीने चौक धक्यालगत सुरक्षित स्थळी आणण्यात मच्छिमारांना यश आले. या अपघातात बोटीचे १० ते १२ लाखांचे नुकसान झाले असुन त्यात बोटीतील मासळी साठविण्याचे कोल्ड स्टोरेज, कॅप्टनच्या केबिनचे पुर्णपणे नुकसान झाले. तसेच इंजिनही नादुरुस्त होऊन मासळीच्या जाळ्याचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले. सुदैवाने या अपघातात बोट मात्र फुटली नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळल्याचे स्थानिक मच्छिमार अजित गंडोळी यांनी सांगितले.