शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अखेर २३७० कोटींच्या अंदाजपत्रकास आयुक्तांचा हिरवा कंदील

By admin | Updated: September 5, 2015 02:55 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पाच महिन्यांत पालिकेच्या उत्पन्नात १४६ कोटींची वाढ झाली असली तरी एलबीटी आणि शहरविकास विभागामुळे सुमारे ३०० कोटींची तूट पडत असल्यानेच

ठाणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पाच महिन्यांत पालिकेच्या उत्पन्नात १४६ कोटींची वाढ झाली असली तरी एलबीटी आणि शहरविकास विभागामुळे सुमारे ३०० कोटींची तूट पडत असल्यानेच या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कशी करायची, असा पेच निर्माण झाला होता. अखेर, टप्प्याटप्प्याने उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालून शुक्रवारी २३७० कोटींच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्यास पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला आहे. विशेष म्हणजे नगरसेवकांना प्रभाग, नगरसेवक, मागास आणि महापौर असा २४० कोटींचा निधी खर्चासाठी मिळणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कपात न करता ती इतर कामांत करून आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना खूश केले आहे. मागील महासभेत अंदाजपत्रकाची अंमलबजावणी न झाल्याच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरून त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी केली होती. त्यानुसार, महापौर संजय मोरे यांनीदेखील एका आठवड्यात त्यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर, शुक्रवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या अंदाजपत्रकाला हिरवा कंदील दाखविला. परंतु, हे करीत असताना एलबीटीमुळे १५० कोटी आणि शहरविकास विभागातही सुमारे १५० कोटींची तूट येत असल्याने ती कशी भरून काढायची, असा सवालही प्रशासनाला आता भेडसावू लागला आहे. सुदैवाने पाणी दरवाढीसह इतर दरवाढींचे प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यातील काही हिस्सा यात वर्ग होऊ शकणार आहे. तरीही, २०० कोटींची तूट राहणार असल्याने ती भरून काढण्यासाठी सर्व विभागांचा अभ्यास केला असून कोणत्या विभागाकडून किती उत्पन्न मिळू शकते, त्यानुसार खर्च किती केला जाऊ शकतो, याचा अभ्यास करून पुढील सात महिन्यांत किती उत्पन्न मिळू शकते, याचाही अंदाज घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसारच खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, भविष्यात उत्पन्न अधिक आणि खर्च कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मागील वर्षी भांडवली खर्चावर १४५० कोटींचा खर्च झाला होता. तर, जेएनएनयूआरएमवर ६५० कोटींचा खर्च झाला होता.