शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पावसाच्या विश्रांतीनंतर उल्हासनगरातील रस्ते दुरुस्तीला मिळाला मुहूर्त

By सदानंद नाईक | Updated: September 30, 2023 19:16 IST

उल्हासनगरातील बहुतांश बाप्पांचे आगमन व विसर्जन खड्डेमय रस्त्यांवरून

सदानंद नाईक, उल्हासनगर: बाप्पाचे आगमन व विसर्जन असताना खड्डयातील रस्त्यातून आलेले वाईट अनुभव पाहता गणेश भक्तांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर पावसाने विश्रांती घेताच मिक्स सिमेंट काँक्रीटकॅच्या साहित्याने, रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. उल्हासनगरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून बाप्पांचे आगमन व विसर्जन खड्डेमय रस्त्यातून झाले.

पावसाची संततधार असल्याने, रस्त्यातील खड्डे भरण्यास अडथळे आल्याची माहिती शहर अभियंता संदिप जाधव यांनी दिली. गणेशोत्सव दरम्यान काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. मात्र संततधार पावसाने डांबरी रस्ते वाहून गेल्याचे चित्र शहरात होते. छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावरील खड्डे पावसाळ्याच्या तीन महिन्यात तीन पेक्षा जास्त वेळा भरण्यात आले होते. शनिवारी दुपारी पुन्हा उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यात आले. 

कॅम्प नं-४, गुरुनानक शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे झाल्याने, नागरिक, मुले व दुचाकी वाहने पडून अनेक जण जखमी झाले. अखेर रिक्षाचालक अशोक शेनदाने यांनी रस्त्यातील खड्डे भरले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, शनिवारी रस्त्यातील खड्डे भरल्याची माहिती समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी दिली. शहरातील पवई चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन, हिराघाट, फॉरवर्ड लाईन ते मध्यवर्ती रुग्णालय, शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता, व्हीनस चौक ते एसएसटी कॉलेज, लालचक्की ते व्हीनस चौक, कुर्ला कॅम्प रस्ता, कैलास कॉलनी रस्ता, नेताजी चौक ते तहसील कार्यालय रस्ता आदींसह अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे न भरल्याने, रस्ते खड्डेमय झाले आहे. 

चौकट रस्त्यातील खड्डे होणार चकाचक पावसाने विश्रांती घेतल्यास एका आठवड्यात शहरातील रस्ते चकाचक होणार असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तसेच एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामालाही सुरवात होण्याचे संकेत शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर