शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

अखेर....उल्हासनगर महापालिका डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवरील अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 3:47 PM

Ulhasnagar News : राणा खदान डम्पिंग ग्राऊंडच्या पायथ्याशी उभे राहिलेल्या अवैध बांधकाम प्रकरणी सर्वस्तरातून महापालिकेवर टीकेची झोळ उठल्यावर बुधवारी सहायक आयुक्त अनिल खतुरानी यांच्या पथकाने बांधकामावर पाडकाम कारवाई केली.

- सदानंद नाईक उल्हासनगर -  राणा खदान डम्पिंग ग्राऊंडच्या पायथ्याशी उभे राहिलेल्या अवैध बांधकाम प्रकरणी सर्वस्तरातून महापालिकेवर टीकेची झोळ उठल्यावर बुधवारी सहायक आयुक्त अनिल खतुरानी यांच्या पथकाने बांधकामावर पाडकाम कारवाई केली. राजकीय वरदहस्तमुळे पाडकाम कारवाई होत नसल्याचे बोलले जात होते.

 उल्हासनगरात गेल्या एका वर्षात शेकडो आरसीसी व टिग्रेटरचे अवैध बांधकामे उभे राहिले असून महापालिकेने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. राणा डम्पिंगच्या पायथ्याशीचा कचरा जेसीबी मशीनच्या मदतीने बाजूला करून अवैध चाळीचे बांधकाम राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने भूमाफियाने सुरू केले. उन्हाळ्यात आगीने तर पावसाळ्यात कचऱ्याचा ढिग सदर बांधकामावर कोसळून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त करून कारवाई मागणी केली. मात्र सहायक आयुक्त अनिल खतूराणी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. असा आरोप सर्वस्तरातून झाला. दोन दिवसापूर्वी भाजपचे आमदार कुमार आयलानी, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक महेश सुखरामनी आदींच्या शिष्टमंडळानें महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची भेट घेऊन शहरातील अवैध बांधकामसह अन्य समस्या बाबत निवेदन दिले.

 अखेर ...आयुक्तांच्या आदेशानव्हे प्रभारी सहायक आयुक्त अनिल खतूराणी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात राणा खदानच्या पायथ्याशी असलेल्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केली. गेल्या महिन्यात डम्पिंग शेजारील एका मोठया अवैध बांधकामावर सहायक आयुक्त अनिल खतूराणी यांच्या पथकाने वाजतगाजत पाडकाम कारवाई केली. मात्र राजकीय दबावामुळे सदर बांधकाम जैसे थे उभे राहिले. महापालिकेची धडक पाडकाम कारवाई ठप्प पडल्याने, शहरात अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाल्याचा आरोप होत आहे. अवैध बांधकामाला संबंधित प्रभाग अधिकारी, स्थानिक नगरसेवक, विविध पक्षाचे नेते व भूमाफिया जबाबदार असल्याचे बोलले जाते. महापालिकेवर शिवसेना आघाडीची सत्ता आल्यापासून, अवैध बांधकामाला सुगीचे दिवस आल्याची टीका भाजपकडून होत आहे.  इतर अवैध बांधकामावर कारवाई कधी? महापालिकेच्या नाकावर टिकचून उभे राहत असलेल्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई कधी? असा प्रश्न आजच्या कारवाई नंतर विचारला जात आहे. उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आरसीसी अनेक बांधकामे उभी राहत आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर