शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘ते’आधारकार्ड केंद्र पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:19 IST

डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली होती. परंतू नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून झालेल्या वादात हे कें द्र गुरूवारपासून बंद करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे आधारचे काम बंद राहील असा फलक कें द्राबाहेर लावण्यात आला असून केंद्र चालक कैलास डोंगरे यांनी सोयी सुविधा पुरविण्याबाबत केडीएमसीकडे मागणी केल्याने आता महापालिकेच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देनोंदणीचा उदभवलेला वाद : आता केडीएमसीच्या भुमिकेकडे लक्ष

डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली होती. परंतू नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून झालेल्या वादात हे कें द्र गुरूवारपासून बंद करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे आधारचे काम बंद राहील असा फलक कें द्राबाहेर लावण्यात आला असून केंद्र चालक कैलास डोंगरे यांनी सोयी सुविधा पुरविण्याबाबत केडीएमसीकडे मागणी केल्याने आता महापालिकेच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील वाचनालयाच्या जागेत राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले आहे. आधारकार्डासाठी याठिकाणी मध्यरात्रीपासूनच नागरीकांच्या रांगा लागतात. परंतू तीनपैकी केवळ दोन युनिटच सध्या चालू असल्याने रांगा लावूनही नंबर लागत नसल्याने नागरीकांची पुरती परवड झाली आहे. दरम्यान केंद्रावर वाढती गर्दी आणि मध्यरात्रीपासून बाहेर लागत असलेल्या रांगा पाहता सुरक्षेच्या अनुषंगाने केंद्रचालक डोंगरे यांनी नवीन आधार नोंदणी व सुधारीत आधार कार्डसाठी टोकण हे सावरकररोडवरील जाणता राजा कार्यालयात सायंकाळी ४ ते ५ यावेळेत मिळेल असे फलक केंद्राबाहेर लावले होते. पण याला आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी हरकत घेत नोंदणी एखादया राजकीय (भाजपच्या) पक्षाच्या कार्यालयात का? असा सवाल केला. यावर डोंगरे यांनी नोंदणीसाठी निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा असे फलक केंद्राबाहेर लावल्याने दोघांमध्ये बुधवारी जोरदार वाद झाला होता. या वादात नागरीक वेठीला धरले गेलेच त्याचबरोबर हे केंद्र बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती शक्यता गुरूवारी प्रत्यक्षात उतरली. त्रांतिक कारण पुढे करीत हे केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासूनच केंद्रावर आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरीकांना बंदच्या सूचना पाहून माघारी परतावे लागले. दरम्यान नोंदणीच्या उदभवलेल्या वादानंतर आता विभागीय कार्यालयातूनच टोकण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण केंद्रावर मनुष्यबळाची कमतरता आणि सुरक्षेचा अभाव असल्याने नोंदणीसाठी मनुष्यबळ महापालिकेने पुरवावे अशी मागणी केंद्रचालक डोंगरे यांनी ग प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याकडे केली आहे. यावर महापालिकेडून कोणती कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे. मात्र जोपर्यंत मनुष्यबळ पुरविले जात नाही तोपर्यंत केंद्र चालू न करण्याचा निर्णय घेतल्याचे डोंगरे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्लीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका