शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वर्तकनगरच्या ‘त्या’ १०८ पोलीस कुटुंबियांचे होणार पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:48 IST

ठाण्याच्या वर्तकनगर येथील धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबाना तात्काळ घरे खाली करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले होते. याच ५१ ते ५२ या तीन इमारतींमधील १०८ कुटूंबियांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णयएमएमआरडीएच्या घरात पुनर्वसनाचे मुख्यमंत्र्याचे आदेश४८ तासांमध्ये घरे खाली करण्याचे दिले होते आदेश

ठाणे: येत्या ४८ तासांमध्ये घरे रिक्त करा, असे आदेश मिळालेल्या वर्तकनगर येथील ५१ ते ५३ या तीन इमारतींमधील १०८ पोलीस कुटुंबियांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. या सर्व कुटुंबियांचे एमएमआरडीएच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.ठाण्याच्या वर्तकनगर येथील धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबाना तात्काळ घरे खाली करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे या वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत पोलीस महिला मंडळाच्या वतीने शैला जाधव, तसेच स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत सातपुते यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली होती. या पार्श्वभूमीवर ऐन पावसाळ्यात योग्य पुनर्वसनाशिवाय पोलीस कुटुंबियांना बेघर करु नका अशी विनंती पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. याच विनंतीची तात्काळ दखल घेत या धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबांचे पुनर्वसन त्वरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना मंगळवारी दिले. दरम्यान, इमारत क्रमांक १४ आणि १६ या धोकादायक असल्या तरी त्या दुरुस्त करुन राहण्यास योग्य असल्यामुळे त्यांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेने पोलीस प्रशासनाकडे मागितले आहे. गेली तीन ते चार महिने इमारत क्रमांक १४ आणि १६ ची दुरुस्ती करण्यात आली असल्यामुळे या दोन्ही इमारतींचे स्थैर्यता प्रमाणपत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिका प्रशासनाकडे देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या या पाठपुराव्यामुळे पोलीस कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसtmcठाणे महापालिका