शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ठाण्यातील खड्डे बुजविले नाहीतर, गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरू; मनसेचा पालिका प्रशासनाला इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: August 29, 2022 15:55 IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे आतापर्यंत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांची सोमवारी भेट घेऊन संताप व्यक्त केला. झोपलेल्या व्यक्तीला उठवता येते पण, झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही, असे सांगत मनसेने यावेळी सोनाग्रा यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातील एमएमआरडीएच्या अखत्यारीत असलेल्या कोपरी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याठिकाणी चार दिवसांपूर्वी खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा आगसन रस्त्यावरही दुचाकी घसरून पडली. त्याचवेळी टँकरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. यामुळे संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोनाग्रा यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

खड्ड्यामुळे कोपरी येथे झालेल्या अपघाताबाबत नगर अभियंत्यांना माहितीच नसून त्याचबरोबर शहरात कुठे खड्डे आहेत, याबाबतही त्यांना माहीत नाही, असा आरोप मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला. झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही, असे सांगत मनसे पदाधिकाऱ्यांनी नगर अभियंता सोनाग्रा यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली. तसेच गणेशोत्सवाच्या काळात वातावरण बिघडू नये, म्हणून आम्ही शांत आहोत. ठाण्यातील खड्डे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कोपरी पुलाचा रस्ता एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतो. संबंधितांना खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच इतर प्राधिकरणालाही खड्डे बुजविण्याच्या सूचना देण्यात येतात. दिवा आगासन भागात १६०० मीटर काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. जमीन वादामुळे ४०० मीटर रस्त्याचे काम रखडले आहेत. याच भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. असे अपघात होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे निरंतर सुरू आहेत. प्रशांत सोनाग्रा,नगर अभियंता, ठाणे महापालिका.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेroad transportरस्ते वाहतूक