शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवनात माफियांकडून मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:13 IST

पालिका, पोलीस, महसूल विभागाला गंध नाही, अर्थपूर्ण संबंधातूनच सुरू आहे प्रकार

मीरा रोड : वरसावेनाका येथील काशिमीरा पोलीस चौकीसमोर असलेल्या एक्स्प्रेस इन हॉटेलच्या मागील भागातील नैसर्गिक कांदळवन-पाणथळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव होत आहे. उच्च न्यायालयाचे आदेश व कायद्याचे सर्रास उल्लंघन करून पर्यावरणाचा ºहास केला जात असताना पालिका, पोलिसांसह महसूल विभागास मात्र याचा गंध नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.वरसावेनाका हा अत्यंत वर्दळीचा असून येथे मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि घोडबंदर मार्गाचा नाका आहे. त्यामुळे काशिमीरा पोलिसांची येथे पोलीस चौकी असून वाहतूक पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात असतात. याच नाक्यासमोर असलेल्या एक्स्प्रेस इन, शेल्टर आदी हॉटेलमागे कांदळवन आणि पाणथळ आहे. शिवाय, हा परिसर सीआरझेडमध्ये मोडतो.याआधी कांदळवनात भराव करून पटेल कम्पाउंड व काठीवाडी ढाबा, होर्डिंग आदी बांधकामे झाली आहेत. तर, सीएनरॉक हॉटेलसाठी कांदळवनात रस्ता बनवण्यात आला आहे. या तिन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल असून अन्य तक्रारी प्रलंबित आहेत. तर, झालेला बेकायदा भराव व बांधकामे तोडण्याची कार्यवाही अजूनही महापालिका करत नाही. भरतीचे महामार्गाखालून येणारे पाणी भराव-बांधकाम करून अडवण्यात आले आहे. पाण्याचा मार्ग खुला करण्यासह कांदळवनाची लागवड केली जात नाही.एकूणच, हा परिसर संवेदनशील असतानाही पालिका आणि सरकारी यंत्रणांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप होत असतानाच काही दिवसांत एक्स्प्रेस इन हॉटेलमागील कांदळवनात सर्रास मातीचा भराव सुरू करण्यात आला आहे. भराव करणारे डम्पर सातत्याने सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून जेसीबीने समतोल करत भूखंड तयार करण्यात आला आहे. आधी दाखल झालेले गुन्हे व संवेदनशील परिसर असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात कांदळवनात चाललेल्या या भरावाकडे पोलिसांपासून पालिका आणि महसूल विभागाने कानाडोळा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.मीरा-भार्इंदरमध्ये कांदळवन नष्ट करून मातीचा भराव करत भूखंड बांधकामांसाठी खुले करण्याचे कारस्थान स्थानिक पालिका व सरकारी यंत्रणांसह काही बिल्डर आणि राजकारणी करत आहेत. वरिष्ठ अधिकारीही अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळेच या पर्यावरणद्रोही माफियांना मोकळीक देण्यात आली आहे.- स्टॅलिन दयानंद, संचालक, वनशक्तीएक्स्प्रेस इन हॉटेलमागे मातीचा भराव करून कांदळवनाचा ºहास होत असल्याबद्दल विभागीय पोलीस उपअधीक्षक यांना कारवाईचे निर्देश दिले आहे. - डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीणकांदळवनात भराव सुरू असल्याचे कळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.- अधिक पाटील,तहसीलदार, ठाणे

टॅग्स :mira roadमीरा रोड