शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

आधी खड्डे बुजवा, मगच टोलवसुली करा; आंदोलकांची आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 07:51 IST

खड्डे बुजवण्याकरिता तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे बाबूभाई शेख यांच्याकडून सांगण्यात आले. 

भिवंडी / पडघा : मुंबई-नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा यामुळे गुरुवारी सर्वपक्षीय स्थानिक आंदोलकांनी पडघा टोलनाक्यावरील टोलवसुली बंद पाडली होती. टोलनाका पूर्ववत सुरू व्हावा याकरिता शुक्रवारी  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  व टोलनाका प्रशासनाने पडघा टाेलनाका कार्यालयात स्थानिक आंदोलकांची एक बैठक बोलावली होती. त्यात टोलनाका तत्काळ सुरू करण्यासंदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्याने पुढील तीन ते चार दिवस पडघा टोलनाका बंदच राहणार आहे.

भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बाळासाहेब साळुंखे, एमएलएन कंपनीचे व्यवस्थापक गिरीश कामत, पिक इन्फ्रास्ट्रक्चर या टोलवसुली कंपनीचे व्यवस्थापक बाबूभाई शेख, पोलीस निरीक्षक दिनेश कटके आदी सहभागी होते. अगोदर  खड्डे बुजवा, मगच खोल नाका सुरू करा या आपल्या मागणीवर डॉ. संजय पाटील, माजी सभापती प्रकाश भोईर, भगवान सांबरे, रवींद्र विशे, शैलेश बिडवी,  शशिकांत गोतारणे, मुशिर नाचन, श्रीकांत गायकर,  अशोक शेरेकर, पडद्याचे सरपंच अमोल बिडवी, उपसरपंच  अभिषेक नागावेकर, रिक्षा युनियनचे अशोक पाटील, विकास थेटे आदी आंदोलक ठाम राहिले.  

आंदोलक असमाधानीखड्डे बुजवण्याकरिता तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे बाबूभाई शेख यांच्याकडून  सांगण्यात आले. आंदोलकांचे यात समाधान न झाल्याने पुढील तीन-चार दिवसांअगोदर खड्डे भरा, मगच टोलनाका सुरू करा, असे सांगण्यात आले. अखेर टोलनाका प्रशासनाला आंदोलकांची ही मागणी मागणी मान्य करावी लागली. यामुळे पुढील खड्डे बुजविण्यापर्यंत लागणाऱ्या  तीन-चार दिवस कालावधीनंतरच पडघा टोल नाका सुरू होणार आहे. तसेच महामार्गावरील प्रलंबित कामेही पूर्ण करण्याचे आश्वासन टोलनाका प्रशासनाने आंदोलकांना दिले आहे.