शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'आमच्या विभागातील रिक्त पदेही भरा!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:40 IST

केडीएमसीतील रिक्त उपसचिवपद आणि अग्निशमन दलातील काही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे.

कल्याण : केडीएमसीतील रिक्त उपसचिवपद आणि अग्निशमन दलातील काही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे. सुरक्षा विभागाला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरली जात नसतानाच जादा कामाचा मोबदलाही मिळत नाही. सलग तीन-तीन ड्युट्या कराव्या लागत असल्याने ही परवड थांबणार कधी? असा सवाल सुरक्षारक्षक व्यक्त करत आहेत.उपमुख्य सुरक्षा अधिकारी, सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि वॉचमन, सुरक्षा रक्षक अशी एकूण २६९ पदे मंजूर आहेत. यातील केवळ १७१ पदेच भरण्यात आली आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. उपमुख्य सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवली आहेत. महापालिका मुख्यालय, कल्याणमधील कार्यालये आणि डोंबिवली विभागीय कार्यालय याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. त्यांच्या मदतीला भांडुप सुरक्षा मंडळाचे ३४ सुरक्षारक्षक घेतले आहेत. तर अन्य १०८ कर्मचारी खाजगी स्तरावर सुरक्षा विभागाला सहाय्यक म्हणून नेमले आहेत. त्यांना केवळ अटेंडंट म्हणून घेतले आहे.रिक्त पदे भरा आणि जादा कामाचा मोबदला मिळावा अशी प्रमुख मागणी सुरक्षारक्षकांची आहे. केडीएमसीतील अग्निशमन दलातील कर्मचाºयांना अतिकालीन भत्ता लागू करण्याबाबत प्रस्ताव एप्रिलमध्ये महासभेत मंजूर झाला. अग्निशमन दल कर्मचाºयांच्या प्रलंबित हक्कांच्या मागण्यांसंदर्भात दोन प्रस्ताव दाखल झाले होते. या कर्मचाºयांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असताना आम्ही काय चूक केली? आमचाही विचार व्हावा, असा सूर सुरक्षा कर्मचारी आळवत आहेत. दरम्यान, सद्य:स्थितीला उपसचिवपद आणि सिस्टीम अ‍ॅनालिसिससह अग्निशमन दलातील फायरमन, लीडिंग फायरमनच्या २४ जागा भरण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आमच्या विभागातील पदे भरावीत, अशी मागणी सुरक्षारक्षक करत आहेत. यासंदर्भात प्रभारी सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी संपर्क केला असता अपुºया मनुष्यबळामुळे कर्मचाºयांवर ताण पडत असून ही पदे भरण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार केल्याचे ते म्हणाले....तर कार्यवाही होईल!सद्य:स्थितीला राज्य सरकारच्या धोरणानुसारच एखाद्या विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. तूर्तास तरी सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरण्याचे प्रयोजन नाही.सरकारने आदेश दिल्यास केडीएमसीतर्फे त्यासंदर्भात कार्यवाही सुरू करून रिक्त पदे भरली जातील, असे सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका