शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कंपाऊंडीग चार्जेस भरण्यासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना जून पर्यंत दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:28 IST

कंपाऊंडीग चार्जेस न भरल्याने ठाण्यातील ४६० हॉटेल सील करण्याची कारवाई पालिका करणार होती. परंतु पालिकेने पुन्हा हॉटेल व्यावसायिकांच्या दिशेने झुकते माप देत, त्यांना जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देमुदतवाढी मागचे गुढ मात्र गुलदस्त्यातहॉटेल व्यावसायिकांना मात्र मिळाला दिलासा

ठाणे - अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रशासकीय दंडात्मक शुक्ल भरल्यानंतर हॉटेल चालकांना व्यवसाय करता येईल अशी आशा होती. परंतु कंपाऊंडींग चार्जेस भरले नाही तर ३१ मार्चनंतर हॉटेल सील केले जातील अशी नोटीस अग्निशमन दलाने बजावण्यास सुरूवात होती. अखेर यावर आयुक्तांनीच तोडगा काढला असून हॉटेल व्यावसायिकांना हे चार्जेस भरण्यासाठी जून पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यावयासिकांना दिलासा मिळाला आहे.            मागील काही महिन्यापासून ठाण्यात अग्निसुरक्षेच्या मुद्यावर ठाणे अग्निशमन दलाने शहरातील ४६० हॉटेल आणि बार व्यावसायीकांना नोटीस बजावली होती. अग्निसुरक्षेची व्यवस्था भक्कम करण्यासोबतच ५ ते २० लाख रु पयांपर्यंतच्या प्रशासकीय दंडात्मक शुल्काचा भार या व्यावसायीकांवर टाकण्यात आला होता. हा दंड भरणे अशक्य असल्याच्या मुद्यावर हॉटेल व्यावसायीकांनी बंद पुकारला होता. त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रशासकीय शुक्लाच्या रकमेत घसघशीत सुट देणअयात आली. ५ ते २० लाखांपर्यंतचे प्रशासकीय दंडात्मक शुक्ल २५ हजार ते चार लाख रु पयांपर्यंत कमी करण्यात आले. हे शुक्ल भरून तसेच अग्निसुरक्षेची यंत्रणा भक्कम करून हॉटेल व्यावसायीकांनी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.दरम्यान, ३१ मार्च, २०१८ पर्यंतच हे प्रमाणपत्र देण्यात आल्याने व्यावसायीकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यातच आता हॉटेल आणि बारचे बांधकाम शहर विकास विभागाकडे कंपाऊंड शुल्क भरून अधिकृत करून घ्या अन्यथा ३१ मार्च नंतर अस्थापनांना सील ठोकले जाईल असा फतवा अग्निशमन विभागाने काढला होता. कंपाऊंड शुल्क हे शहर विकास विभागाशी संबंधित असताना अग्निशमन दल त्याबाबतची नोटीस का देत आहे असा सवाल व्यावसायीकांकडून उपस्थित केला जात होते. तसेच कंपाऊंडींग शुल्काची रक्कम प्रचंड असल्याने ती भरणे व्यावसायीकांना शक्य नाही. तसेच, अनेक व्यवसाय हे भाडेतत्वावरील जागांवर असून मुळ मालक हे शुक्ल भरण्यास तयार नसल्याने व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे या व्यावसायीकांचे म्हणणे झाले होते.      त्यानंतर ३१ मार्च पर्यंत सुमारे १० जणांनीच ही रक्कम भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शहरातील उर्वरीत हॉटेल सील केले जातील अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु पालिका आयुक्तांनी पुन्हा या हॉटेल व्यावसायिकांना काहीसा दिलासा दिला आहे. कंपाऊंडींग चार्जेस भरण्यासाठी आता जून पर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.वारंवार मुदत वाढ कशासाठीपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ३१ मार्च पर्यंत शहरातील बार आणि हॉटेल्स व्यासायिकांना कपाऊंडीग फी भरण्याची मुदत दिली होती. त्यानंतर हे चार्जेस न भरणाऱ्या बार व हॉटेल्सला सील करण्याची घोषणा केली होती. मात्र पुन्हा एकदा हॉटेल्स व्यासायिकांना ही फी भरण्याची मुदत देण्यात आली असून ती मुदत आता थेट जूनपर्यंत देण्यात आली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही हॉटेल्स व्यावसायिक कपाऊंडींग चार्जेस भरत नसताना अजूनही हॉटेल्स व्यावसायिकांना मुदतवाढ का दिली जाते याबाबत मात्र गूढ निर्माण झाले आहे . 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhotelहॉटेल