शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिकेतील फाईलचोरी प्रकरण: सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल शिंदे ‘नॉटरिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:49 IST

अनधिकृत बांधकामांची आणि कोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील शिंदे हे शुक्र वारपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २०आॅक्टोबर रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्दे अटकपूर्व जामिनावर २० आॅक्टोबरला सुनावणीकोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बदलीची आॅर्डर निघताच दिव्यातील अनधिकृत बांधकामांची आणि कोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील शिंदे हे शुक्र वारपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. डायघर पोलीस ठाण्यात पालिकेने रितसर गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची शक्यता होती. त्यामुळेच अटक टाळण्यासाठी त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांचा अर्ज राखून २०आॅक्टोबरची तारीख देताच ते आता नॉटरिचेबल झाले आहेत.ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व प्रभाग समित्यांमधील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांची आॅर्डर १७ आॅगस्ट रोजी काढली होती. त्यानुसार मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदी बदली झाली. तर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त डॉ. मोरे यांची निवडणूक विभागात बदली झाली. त्यानंतर दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयातून संगणक आणि फाईल्स चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले. दिव्यातील बेकायदा बांधकामांचा लेखाजोखा असलेली फाईल चोरी केल्याप्रकरणी मोरे यांच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंततर ३० सप्टेंबर रोजी त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई करण्यात आली.शुक्रवारपासून गैरहजरपालिका आणि पोलीस तपासात मोरे यांनी बेकायदा बांधकाम आणि कोविड साहित्य खरेदीच्या सुमारे सात फाईल चोरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. ही अटक टाळण्यासाठी कथित आरोपी मोरे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला. पालिका आयुक्तांनी मोरे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करताना रोज पालिकेत हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र अटकपूर्व जामिनावर न्यायालयाचा कोणताच निर्णय न झाल्याने शुक्र वारपासून सहाय्यक आयुक्त मोरे पालिका मुख्यालयात गैरहजर असून त्यांचा मोबाइलही नॉटरिचेबल आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिका