शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री मीरा चोप्रा, सौम्या टंडनवर गुन्हा दाखल करा; स्थायी समिती सभापतींचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 08:08 IST

याप्रकरणी ओळखपत्र देणाऱ्या ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केल्यानंतर अखेर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले. 

ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा हिने बनावट ओळखपत्र तयार करून लस घेतल्यानंतर आणखी २५ बेकायदा ओळखपत्रे देऊन १५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची बाब उघड झाली. तसेच आणखी एक अभिनेत्री सौम्या टंडन हिलाही ओळखपत्र देण्यात आल्याने त्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. याप्रकरणी ओळखपत्र देणाऱ्या ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केल्यानंतर अखेर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले. राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले असताना, ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर ओळखपत्र तयार करून तब्बल १५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अशी २५ ओळखपत्रे तयार करण्यात आली असून, तसा अहवाल चौकशी समितीने आयुक्तांना सादर केला आहे. भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण म्हणाले की, ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. ही कंपनी दोषी असून, त्यांच्याच माध्यमातून ही ओळखपत्रे देण्यात आल्याचे दिसत आहे.१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले असताना बनावट ओळखपत्र देऊन काही नागरिकांचे बेकायदेशीर लसीकरण केले आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. २५ ओळखपत्रे तयार करण्यात आली असून, तसा अहवाल चौकशी समितीने आयुक्तांना सादर केला आहे. विक्रांत चव्हाण यांनीही दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या प्रकरणात जे जे दोषी असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले.