शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात गुन्हा दाखल करा अन्यथा वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून महाआरती करु!

By अजित मांडके | Updated: January 4, 2024 10:59 IST

पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यातच महाआरती करण्यात येईल, असा जाहीर इशारा दिला आहे.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: प्रभू श्री राम हे मांसाहारी होते, असे अकलेचे तारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडलेत पण ॠषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्री रामांनी मांसाहार केल्याचा कुठेही उल्लेख नाही. असे असताना सातत्याने जितेंद्र आव्हाड हे हिंदू देवदेवतांविरुद्ध, सनातन धर्माविरुद्ध, हिंदू धर्माविरुद्ध बोलतात आणि धर्माचा अपमान करतात तर दुसरीकडे बहुजन विरु वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभू श्री रामाची महाआरती केली म्हणून गोमूत्र शिंपडतात. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी, प्रभू श्री रामांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल, जितेंद्र आव्हाड यांच्यावर येत्या २४ तासात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलीस ठाण्यातच महाआरती करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.

शिर्डी येथील अधिवेशनामध्ये स्वतःला जे इतिहासाचे संशोधक म्हणतात त्या डाॅ जितेंद्र आव्हाड साहेब यांनी प्रभू श्री रामाचा अपमान करत, प्रभू श्री राम हे मांसाहारी होते, १४ वर्ष ज्यावेळी ते वनवासात होते तेव्हा अरण्यामध्ये शिकार करुन, मांसाहार करुन त्यांनी आपले वास्तव्य केले. प्रभू श्री रामांना बहुजन आणि सवर्ण यांच्यात वाटण्याचे कामदेखील त्यांनी केले. प्रभू श्री राम हे बहुजन होते म्हणून त्यांचा आदर्श ठेवून आम्ही मांसाहार करतो, अशाप्रकारचे अकलेचे तारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडले आहेत. ॠषी वाल्मिकी यांनी जे रामायण लिहिले आहे ज्यात २४ हजार श्लोक लिहिले आहेत. ७ खंडामध्ये रामायण हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्याच्यामध्ये बालखंड आहे, अयोध्या खंड आहे, अरण्य खंड आहे, किष्किन्धा खंड आहे, सुंदर काण्ड आहे, युद्ध कांड आहे आणि शेवटच उत्तर खंड आहे. या सातही खंडांमध्ये २४ हजार श्लोक लिहिले आहेत. त्याच्यात कुठेही प्रभू श्री रामाने मांसाहार केला होता हे कुठेही आढळून येत नाही. वनवासात असताना देखील फळे, कंदमुळे खावून प्रभू श्री रामांनी वास्तव्य केले. अशी स्थिती असताना, कायम हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलायचे ही डाॅ जितेंद्र आव्हाड यांची संस्कृती आहे.

धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्माचा अपमान नाही, धर्मनिरपेक्षता म्हणजे मी हिंदू धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन, मी मुस्लिम धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन, मी ख्रिश्चन धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन आणि मी शिख धर्माचा,  बौद्ध धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन हा धर्मनिरपेक्षवाद आहे. पण सातत्याने हिंदू देवतांबद्दल अभद्र बोलायचे, अपमान करायचा ही डाॅ जितेंद्र आव्हाड यांची सवय आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे, आमच्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळेच विरु वाघमारे व त्याचे सहकारी हे कुठलेही आंदोलन करण्यासाठी नव्हे तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्री रामावरील वक्तव्याचा शांततापूर्णरित्या निषेध करण्यासाठी तिथे गेले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये प्रभू श्री रामाचा फोटो होता आणि ते तिथे महाआरती करणार होते. पण दुर्देवाने मला पोलिसांचा देखील निषेध करावसा वाटतो की या लोकशाहीमध्ये महाआरती करण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखले आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला घेऊन आले.  

मी बहुजनांचा नेता आहे हे सांगायचे आणि बहुजन समाजातील विरु वाघमारे व त्यांचे बहुजन समाजातील सहकारी हे प्रभू श्री रामांची महाआरती करायला तिथे आले म्हणून जर  गोमूत्र शिंपडत असाल तर याच्यापेक्षा हिंदू धर्माचा कुठला अपमान आहे ? सातत्याने सनातन धर्माविरुद्ध, हिंदू धर्माविरुद्ध बोलायचे, खोटे बोलायचे ही जितेंद्र आव्हाड यांची पद्धत आहे. यामुळे पुढच्या २४ तासात जितेंद्र आव्हाड यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यातच महाआरती करण्यात येईल, असा जाहीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड