शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निविदा भरण्यावरून मीरा-भाईंदर पालिकेत कंत्राटदारांमध्ये हाणामारी; अदखलपात्र गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:19 IST

मंगळवारी शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या दालनांना लागूनच कंत्राटदार राजू सिंग व कुणाल जोशी यांच्यात बांधकाम विभागाची निविदा भरण्यावरून वाद सुरु झाला.

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेत टेंडर सेटिंग आणि टक्केवारीचे होणारे आरोप नवीन नाहीत. त्यातच महापालिका मुख्यालयात बांधकाम विभागाची निविदा भरण्यावरून दोन कंत्राटदारांमध्ये  मंगळवारी दुपारी हाणामारी झाली. या घटनेनंतर पालिकेने चिडीचूप राहणे पसंत केले असून भाईंदर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.  

मीरा- भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयातील चौथ्या मजल्यावर बांधकाम विभाग आहे. मंगळवारी शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या दालनांना लागूनच कंत्राटदार राजू सिंग व कुणाल जोशी यांच्यात बांधकाम विभागाची निविदा भरण्यावरून वाद सुरु झाला. जोशी यांच्या कंपनीने मीरा रोडच्या एका रस्त्याच्या कामाची निविदा भरल्याने राजू व जोशी यांच्यात वाद झाला. त्यावरून शिवीगाळ आणि नंतर हाणामारी झाली.  राजू यांच्या तोंडाला मार लागून रक्त वाहू लागले . उपस्थितांनी दोघांमधील भांडण सोडवले. 

दोघेही भाईंदर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. राजू यांच्या तक्रारीवरून कुणाल जोशीवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतरही महापालिका प्रशासन व सत्ताधारी - विरोधकांनी मूग गिळून गप्प राहणे पसंत केल्याचे सध्या तरी चित्र आहे. मीरा- भाईंदर महापालिकेत टेंडर आणि टक्केवारीचे आरोप नवीन नाहीत. कामाचे देयक काढायचे असेल तर टक्के मागणाऱ्या पालिका अधिकाऱ्यास लाच घेताना तसेच काम मिळाले म्हणून लाच देताना कंत्राटदारास पकडल्याचे गुन्हे दाखल आहेत. निविदा भरण्यावरून या आधीही मारामारी, भांडणांचे प्रकार घडले आहेत.  

नेमके सीसीटीव्ही बंदपालिकेच्या चौथ्या मजल्यावर ज्या ठिकाणी मारामारी झाली त्या भागाचे पालिकेचे सीसीटीव्ही नेमके बंद होते त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर पालिकेने नागरिकांना एकीकडे पालिका प्रवेशासाठी वेळेचे बंधन घातले असताना कंत्राटदार मात्र खुशाल पालिकेत फिरतात अशी टीकेची झोड उठली आहे. प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक