शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील 50 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद, महापालिकेचा वायफायचा हिस्साही बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 19:01 IST

मागील दोन वर्षांत केवळ तीन हजार रुपये जमा झाल्याचे समोर आल्याने नगरसेवकांनी याबाबतही नाराजी व्यक्त केली.

ठाणे  : शहरातील कायदा सुव्यस्था आबादीत राहावी, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला आळा बसावा तसेच शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु त्यातील तब्बल 50 टक्के कॅमेरे बंद असल्याचा धक्कादायक आरोप नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी केला. दुसरीकडे वायफाय उपक्रम राबविणा-या ठेकेदाराने पालिकेचा हिस्सा अद्यापही दिला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांत केवळ तीन हजार रुपये जमा झाल्याचे समोर आल्याने नगरसेवकांनी याबाबतही नाराजी व्यक्त केली.ठाणो महापालिका हद्दीत मागील वर्षी प्रभाग सुधारणा निधीतून 1200, वायफाय योजनेतून 100 असे 1300 कॅमेरे शहरातील विविध रस्त्यांवर बसविण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून 100 कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच अन्य 400 च्या आसपास कॅमेरे बसविण्यात येणार होते. शहरातील कायदा सुव्यस्था आबादीत राहावी, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला आळा बसावा तसेच शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  परंतु काही वर्षांपुर्वी मोठा गाजावाजा करत शहरभर लावलेले कॅमेरे बंद असल्याची बाब सातत्याने समोर येत असतानाच, आता शहरातील 50 टक्के कॅमेरे बंद असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत केला आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी हा मुद्दा उचलून धरत याला समर्थन दिले. नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख रु पये यासाठी खर्च करण्यात आला होता. परंतु हे कॅमेरे बंद पडल्याने त्याचा खर्च पाण्यात गेल्याची खंत नगससेवकांनी यावेळी व्यक्त केली.दरम्यान दुसरीकडे शहरात वायफाय योजनाही सुरु करण्यात आली आहे.  सुरवातीला मोफत वायफाय सेवा दिल्यानंतर या योजनेतून काही ठराविक पैसे वापरकत्र्याला द्यावे लागणार होते. त्यातून जे उत्पन्न मिळणार होते, त्यातील काही टक्के हिस्सा हा महापालिकेला दिला जाणार होता. हे वायफाय चालविण्यासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु संबधींत ठेकेदाराने तो हिस्सा अद्यापही पालिकेला दिला नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. परंतु त्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यात केवळ तीन हजार रु पये ठेकेदाराने जमा केले आहेत, अशी माहिती उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी दिली. यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक आक्र मक झाले आणि त्यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. अखेर या योजनेतील त्रुटींचा अहवाल करून महोसभेपुढे सादर करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी यावेळी दिले.

शहरातील कॅमे-यांच्या बाबतीत सध्या आम्ही मेटेंनेन्सचे काम पाहत आहोत, परंतु आतार्पयत कधीच 50 टक्के कॅमेरे बंद पडलेले नाहीत. कॅमेरे मॉनिटरिंगचे काम हे महापालिकेच्या माध्यमातूनच सुरु आहे. त्यामुळे या बाबत पालिकाच माहिती देईल. तर वायफायच्या बाबतीत 14.23 टक्के हिस्सा पालिकेला मिळणो अपेक्षित आहे, आम्ही तो हिस्सा देण्यास तयारही आहोत, मात्र पालिकेबरोबर झालेल्या करारानुसार पालिकेला इतर सेवादेखील देत आहोत, त्या सेवांच्या बदल्यात पालिका आम्हाला बाजारभावापेक्षा 25 टक्के रक्कम देणार होती. परंतु पालिकेने अद्यापही ती रक्कम दिलेली नाही. त्याबाबत पालिकेच्या अधिका:यांशी चर्चा सुरु असून त्यावर लवकरच तोडगा निघेल.(अमोल नलावडे - इनटेक्ट ऑनलाईन प्रा. लि. - संचालक)

टॅग्स :cctvसीसीटीव्ही