शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डागडुजीसाठी पंधरा दिवस डोंबिवलीतील तरण तलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:48 IST

डागडुजीच्या कामासाठी डोंबिवलीमधील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प.सावळाराम क्रिडा संकुलातील तरण तलाव २८ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ऐन सुटीत लहान मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनसेने मंगळवारी तरण तलावाच्या ठिकाणी भेट देत महापालिकेने जाणिवपूर्वक हा तलाव सुट्यांच्या मोसमात बंद ठेवण्यात येत असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्दे आठ दिवसांत सुरु न केल्यास मनसे करणार आंदोलन ४ लाखांमध्ये सुरु आहे दुरुस्तिची कामे

डोंबिवली: डागडुजीच्या कामासाठी डोंबिवलीमधील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प.सावळाराम क्रिडा संकुलातील तरण तलाव २८ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ऐन सुटीत लहान मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनसेने मंगळवारी तरण तलावाच्या ठिकाणी भेट देत महापालिकेने जाणिवपूर्वक हा तलाव सुट्यांच्या मोसमात बंद ठेवण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच आठ दिवसांत ही सुविधा सुरू न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला.परीक्षा संपल्या आणि शाळांना सुट्ट्या लागल्या, की लहानग्यांना खेळांचे वेध लागतात. कुणी स्विमिंग शिकतो, तर कुणी स्केटिंग, मात्र तरण तलाव डागडुजीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महापालिकेचा हा तरण तलाव आॅलिम्पिक दर्जाचा असून येथे पोहायला येणा-यांची संख्या लक्षणिय आहे. मात्र ही दुरुस्ती ऐन सुट्ट्या लागल्यानंतर करण्यात येत असल्यानं बच्चेकंपनी नाराज झालीये. याबाबत माहिती मिळल्यांनातर मनसे पदाधिका-यांनी धडक देत पालिका प्रशासनाला फैलावर घेतले. नेमका उन्हाळ्याच्या सुट्टीतच दुरुस्तीचे काम कसे काढले जाते? खासगी तरण तलावांचा धंदा जोरात व्हावा म्हणून मुद्दाम हा प्रकार होतोय का? अशा प्रश्नांचा भडीमार करत मनसेने ऐन मोसमात सुविधा बंद का ठेवली असा सवाल केला. आठ दिवसांच्या आत हा तरण तलाव सुरू झाला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महापालिकेचे गटनेते प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.१६ मार्च रोजी या तलावाच्या डागडुजीच्या कामासाठी ४ लाखांची फाइल मंजूर झाली. त्यानंतर २८ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ही सर्व कामे करण्यात येणार आहेत. त्या कामामंध्ये मुख्य तलावातील फरशा निखळल्या असून त्या अबालवृद्धांना लागतात, शिड्या तुटल्या आहेत, लोखंडी बार तुटले आहेत, डागडुजीमध्ये वेल्डिंगची काम अधिक आहेत, त्याखेरीज अन्य कामे झाल्यावर तात्काळ ही सुविधा सुरु होइल - शैलेश मळेकर, अभियंता, केडीएमसी 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण