शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रवेशाचा फज्जा; नेत्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:00 IST

भाजपाकडून पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. दिग्गज प्रवेश करतील, असे वाटत होते. मात्र, भाजपा संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रवेश केल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला.

उल्हासनगर : भाजपाकडून पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. दिग्गज प्रवेश करतील, असे वाटत होते. मात्र, भाजपा संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रवेश केल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला.शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं आदी पक्षांतील दिग्गजांनी प्रवेश केला नसल्याने कार्यक्रमाचे आयोजक व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पक्षविस्ताराच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले. रवी पाटील, अमर लुंड, विनोद ठाकूर यांच्यासह मोजक्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. गेल्या आठवड्यात ओमी टीमने कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा घेऊन भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शहर भाजपाने प्रचंड गाजावाजा करत बुधवारी पक्षप्रवेश कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमाला राज्यमंत्री चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, श्वेता शालीन, महापौर पंचम कलानी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, प्रदेश सचिव प्रकाश माखिजा, सभागृह नेते जमनू पुरस्वानी, प्रदीप रामचंदानी आदी उपस्थित होते. शिवसेना, रिपाइं, साई, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांतील दिग्गज नेते व पदाधिकारी पक्षात प्रवेश करतील, अशी सर्वांना आशा होती.भाजपा नगरसेविका मीनाक्षी पाटील यांचे पती रवी, शिवसेनेचे माजी नगरसेवक व उपमहापौर विनोद ठाकूर, साई पक्षाच्या नगरसेविका कांचन लुंड यांचे पती अमर यांनी प्रवेश केला. पाटील यांचे मोठे बंधू विजय पाटील भाजपाचे नगरसेवक आहेत. तसेच विनोद ठाकूर यांचा मुलगा भाजपा युवक संघटनेचा ठाणे व पालघर जिल्ह्यांचा महासचिव आहे, तर अमर लुंड हे महापौर निवडणुकीत भाजपासोबत होते.कार्यक्रमाला गालबोटकॅम्प नं.-५ येथील साई झुलेलाल प्रवेशद्वाराशेजारी भाजपा कार्यकर्त्यांनी नेत्याच्या आगमनाच्या आनंदापोटी फटाक्यांची आतषबाजी केली. फटाक्यांमुळे साई झुलेलाल प्रवेशद्वाराजवळ अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.२५ डिसेंबरला कार्यक्रममाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २५ डिसेंबरला पुन्हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. त्यावेळी इतर पक्षांतील दिग्गज प्रवेश करतील, अशी आशाही पुरस्वानी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपाulhasnagarउल्हासनगर