शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयकाअभावी दिल्लीत महाराष्ट्रातून कमी अर्ज, सांस्कृतिक समितीसंदर्भात डॉ. प्रकाश खांडगे आणि नंदेश उमप यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 09:42 IST

उत्सव ७५ अंतर्गत टाऊन हॉल येथे सोमवारी ‘संगीत आणि लोकसंगीत’ यावर परिसंवाद झाला. यावेळी उमप म्हणाले की, अर्जांची छाननी करताना मणिपूरमधून ७५ अर्ज आले होते. महाराष्ट्रातील केवळ पाच आले.

ठाणे : सांस्कृतिक संस्थांना अनुदान देणाऱ्या केंद्र सरकारच्या केंद्रीय समितीकडे महाराष्ट्रातून फार कमी अर्ज जातात.  महाराष्ट्रात सांस्कृतिक संस्थांचा योग्य समन्वय नसल्यामुळे अर्जांची संख्या अत्यल्प असते, अशी खंत लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी व्यक्त केली. ज्यावेळी या समितीकडे अर्ज येतात, त्यातून इतर राज्यांतील सांस्कृतिक संस्थांचा आणि कलावंतांचा समन्वय पाहायला मिळतो. महाराष्ट्रातून येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा दोघांनी व्यक्त केली. उत्सव ७५ अंतर्गत टाऊन हॉल येथे सोमवारी ‘संगीत आणि लोकसंगीत’ यावर परिसंवाद झाला. यावेळी उमप म्हणाले की, अर्जांची छाननी करताना मणिपूरमधून ७५ अर्ज आले होते. महाराष्ट्रातील केवळ पाच आले. कदाचित मणिपूरमध्ये हेवेदावे नसावे. जे आमच्या महाराष्ट्रात आहेत. एकमेकांना मदत करायला हवी. एवढे मुक्त विचार का नाही? उमप यांच्या दाव्याला दुजोरा देत डॉ. खांडगे म्हणाले की, त्या कमिटीवर मीही आधी होतो. महाराष्ट्रातून किती संस्थांना अनुदान मिळते हे मी पाहिले. त्यावेळी ज्यांनी अर्ज केले त्यापैकी तीन ते चार संस्था बोगस होत्या. ज्येष्ठ गायक पं. सुरेश बापट यांनी सुरुवातीला बंदिशी सादर केली. शास्त्रीय गायिका श्रुती गोखले यांनी आपल्या गायनाचा प्रवास उलगडला. धर्मवीर चित्रपटातील देवीचे गाणे करण्याचा हट्ट मी पकडला होता आणि ते करण्याची संधी मला मिळाली. माझा जन्म या ठाण्यात झाल्याचा मला अभिमान आहे, असे संगीतकार महेश ओगले यांनी सांगितले. 

परिस्थितीनुसार संगीत द्यावे लागते!एखाद्या गाण्याला संगीत देताना थोडीफार तडजाेड करावी लागते. तडजाेड न करता आपण त्यातून शिकू या असा विचार केला तर नवीन शिकायला मिळते. कधी कधी परिस्थितीनुसारही गाण्याला संगीत द्यावे लागते, हे सांगताना टाइमपास चित्रपटाचा किस्सा ओगले यांनी सांगितला.

टॅग्स :thaneठाणे