शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तरुणाईच्या जल्लोषात रंगली ठाण्यातील दिवाळी पहाट, ढोलताशा, डीजे आणि बँड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 16:17 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट अर्थात दिवाळीचा पहिला दिवस रंगला. 

ठळक मुद्दे तरुणाईच्या जल्लोषात रंगली ठाण्यातील दिवाळी पहाटढोल ताशा, डीजे, ब्रास बँड साऱ्याचा आनंद लुटला तरुणाईने दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: तरुणाईच्या जल्लोष आणि उत्साहात दिवाळीचा पहिला दिवस अर्थात दिवाळी पहाट ठाण्यात रंगली. ढोल ताशा, डीजे, ब्रास बँड साऱ्याचा आनंद तरुणाईने लुटला. यावेळी दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव  होत होता. नृत्य, गाणी आणि जल्लोषात ही पहाट रंगत गेली.

नरक चतुर्दशीला राम मारुती रोड, तलावपाळी येथे एकत्र जमून दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा यंदाही तरुणाईने राखली. सकाळी सहा वाजल्यापासून राम मारुती रोड, तलावपाळी, गोखले रोड यांठिकाणी तरुणाईने येण्यास सुरूवात केली. सकाळी ८ वाजता ही ठिकाणे गर्दीने तुडुंब भरले. काहींनी आपल्या शाळेजवळ भेटून दिवाळी साजरी केली. राम मारुती रोड व तलावपाळी हे गर्दीने तर ओसंडून वाहत होते. प्रत्येक जण पारंपारिक वेशभूषेत आले होते आणि आपल्या मित्र मैत्रिणीला शुभेच्छा देऊन सणाचा आनंद व्यक्त करीत होते. राम मारुती रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलजवळ ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यावतीने आगरी कोळी ब्रास बँड, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स समोर ठाणे युवाच्यावतीने डीजे, रॉक बँड, राम मारुती रोडवर द ब्रदर्स प्रतिष्ठानच्यावतीने आणि तलावपाळी येथे खा. राजन विचारे यांच्यावतीने डीजेचे आयोजन केले होते. या ठिकाणी ढोल ताशांचाही गजर झाला. मराठी - हिंदी गाण्यांवर तरुणाई थिरकत होती. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गर्दीचा महापूर ओसंडून वाहत होता. यावेळी पोलीसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. राम मारुती रोड येथील गर्दी पाहता या ठिकाणी येणारे काही रस्ते बंद ठेवण्यात आले होते. यावेळी तरुणाईला शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आ. संजय केळकर, भाजपच्या अ‍ॅड. माधवी नाईक, सभागृह नेते नरेश म्हस्के, आ. निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले हे देखील उपस्थित झाले होते. वंदे मातरम संघच्यावतीने नृत्य आणि फॅशन शो आयोजित केला होता. सेल्फी वेड्या तरुणाईंसाठी या ठिकाणी सेल्फी पाँईंटही उभारला होता.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईDiwaliदिवाळी