ऑनलाइन लोकमतमीरारोड, दि. 24 - गटाराचे काम सुरू असताना लगतच्या इमारतीची कुंपण भिंत कोसळुन १ मजुर ठार तर २ मजुर जख्मी झाल्याची घटना आज त्री पावणे आठच्या सुमारास भार्इंदरच्या जेसल पार्क भागात घडली. येथील रेल्वे समांतर मार्गावर महापालिकेने खोल गटाराचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यासाठी सुमारे १५ ते २० फुट खोदकाम करण्यात आले आहे. काम सुरु असतानाच आज रात्री पावणे आठच्या सुमारास लगतच्या एजंल इमारतीची कुंपण भिंत काम सुरु असलेल्या भागात कोसळली. त्यावेळी खाली तीन मजुर काम करत होते. त्यातील मुन्ना (४०) हा मजुर मरण पावला तर रवी चौधरी (२०) व मोहम्मद अकलास आलम (२०)हे दोघे जखमी झाले. जखमींना नजिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गटाराच्या काँक्रिट भिंतीसाठी बाहेर आलेल्या सळ्यां वर भिंत पडल्याने सळ्या वाकल्या. जेणे करुन पुर्ण भिंत खाली काम करणारया रवी व मोहम्मद वर न पडल्याने ते सुदैवाने बचावले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडेंसह प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे, सुनिल यादव तेच नवघर पोलिस घटनास्थळी धाऊन आले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केले. महापालिकेने सदर कामाचे कंत्राट बोरीवलीच्या स्पार्क सिव्हिल इन्फ्रा प्रोजेक्टस ला दिले आहे. गटार बांधण्यासाठी खोल खोदकाम केले जात असताना लगतची कुंपण भिंत कोसळण्याची शक्यताच विचारात घेतली गेली नाही. त्या अनुषंगाने महापालिका व ठेकेदार यांनी आवश्यक खबरदारी न घेतल्याने हा अपघात होउन मजुराचा बळी गेल्याचे सकृत दर्शनी समोर आले आहे.
गटाराच्या कामादरम्यान कुंपण भिंती कोसळून १ ठार ; २ जखमी
By admin | Updated: April 24, 2017 21:15 IST